IPL 2025 LSG vs RCB Match updates in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौवर दणदणीत विजय मिळवत क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आरसीबीने जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. याशिवाय आरसीबीने इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठं लक्ष्य यशस्वीपणे पार करत विजय मिळवला आणि १४ सामन्यांनंतर गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सविरूद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यासह अंतिम सामना खेळण्यासाठी संघांकडे दोन संधी असतील. आरसीबीने यासह इतर संघांच्या घरच्या मैदानावरील सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

लखनौने दिलेल्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची चांगली सुरूवात झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी ५ षटकांत ६० धावा करत दणक्यात सुरूवात केली. सॉल्ट ३० धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. विराट ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावा केल्या आहेत. तर रजत पाटीदार १४ धावा करत बाद झाला. यानंतर मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा यांनी संघाला विजयापर्यंत नेले.

मयंक अग्रवालने २३ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जितेश शर्माने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ८५ धावा केल्या. या दोघांनी एकामेकांना चांगली साथ देत संघाला विजय मिळवून देत माघारी परतले. दोघेही खेळाडू नाबाद माघारी परतले आणि संघाला ८ चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने २२७ धावांची मोठी धावसंख्या केली आहे. ऋषभ पंतने धावांचा दुष्काळ संपवत शतकी खेळी केली. त्याने ६१ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या. त्याच वेळी, मिचेल मार्शने ६७ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या. आरसीबीकडून नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.