RCB vs SRH, IPL 2025: सनरायझर्स हैदराबादचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. ट्रॅव्हीस हेडची आणि अभिषेक शर्माची जोडी पावरप्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांची चांगलीच धुलाई करते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही या जोडीने आक्रमक सुरूवात केली. यादरम्यान अभिषेक शर्माने खणखणीत षटकार मारला, जो जाऊन कारला जाऊन लागला. या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिषेक शर्माचा खणखणीत षटकार

डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने काही मोठे फटके मारले. यादरम्यान एक चेंडू स्टँडमध्ये असलेल्या कारला जाऊन लागला. तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून दुसरे षटक टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला.

या षटकातील पाचवा चेंडू भुवनेश्वर कुमारने शॉर्ट टाकला. या चेंडूवर अभिषेक शर्माने डिप मिडविकेटच्या वरून मोठा फटका मारला. हा चेंडू स्ँटडमध्ये असलेल्या कारच्या काचेला जाऊन लागला. चेंडू लागताच कारची काच फुटली. यासह अभिषेक शर्माने एकाच दगडात दोन पक्षी मारले. अभिषेक शर्माला ६ धावा मिळाल्या. यासह टाटा समूहाकडून ५ लाख रुपयांची क्रिकेट किट गरजू खेळाडूंना दिली जाणार आहे. त्यामुळे अभिषेक शर्माचा एक षटकार ५ लाखांचा ठरला आहे.

अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी

अभिषेक शर्माला या डावात चांगली सुरूवात मिळाली होती. मात्र, त्याला या चांगल्या सुरूवातीचं रुपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही. तो १७ चेंडूत ३४ धावा करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ३ गगनचुंबी षटकार मारले. त्याने ट्रॅव्हीस हेडसोबत मिळून ५४ धावांची भागीदारी केली. मात्र, लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर तो बाद होऊन माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Playing XI): फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एन्गिडी, सुयश शर्मा

सनरायझर्स हैदराबाद (Playing XI): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.