IPL 2025 Angrily Ricky Ponting Rushes in Dressing Room: आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जला आरसीबीविरुद्ध ८ विकेटने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सचे फलंदाज या सामन्यात अजिबात टिकू शकले नाही आणि परिणामी संघ १०३ धावांवर सर्वबाद झाला. पंजाबचा एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही आणि मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. पंजाबची फलंदाजी कोसळताना पाहून रिकी पॉन्टिंग इतका संतापला की तणतणत उठून थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला.

आरसीबीचा संघ या विजयासह थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर आता पंजाब किंग्जच्या संघाला क्वालिफायर-२ सामना खेळावा लागेल जिथे ते जिंकल्यास अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतील. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांची खराब फलंदाजी होती. ज्यामध्ये त्यांचा निम्मा संघ ५० धावांच्या माघारी परतला. टॉप-५ पैकी चार फलंदाजांना दुहेरी अंकही ओलांडता आला नाही, ज्यामध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरचा देखील समावेश होता.

श्रेयस अय्यर २ धावा करत जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या सामन्यादरम्यान रिकी पॉन्टिंग संघाची फलंदाजी पाहून रागात तणतणत उठून ड्रेसिंग रूममध्ये जातो. जिथे पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर चर्चा करताना दिसत आहे. यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात, जेव्हा पंजाब किंग्जने २७ धावांवर आपला दुसरा विकेट गमावला, तेव्हा त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरकडून संघाला मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु जोश हेझलवूडचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळताना तो झेलबाद झाला. या हंगामात अय्यर फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आरसीबीसाठी ही मोठी विकेट होती.

त्याच वेळी, श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेला. तितक्यात डगआउटमध्ये बसलेला पंजाब किंग्जचा कोच रिकी पॉन्टिंग देखील रागाच्या भरात डगआउट सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाताना दिसला. दोघांमधील ड्रेसिंग रूममधील चर्चा करतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये अय्यर पॉन्टिंगवर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

दरम्यान रिकी पॉन्टिंग रागाच्या भरात उठून जाताना आणि मैदानावर एक रागात कटाक्ष टाकताना दिसत आहे. ज्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. पॉन्टिंग यादरम्यान इतक्या आवेगात उठला की जाऊन कोणाला तरी नक्कीच मारेल, अशा प्रतिक्रिया चाहते सोशल मीडियावर देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पराभवानंतर, पंजाब किंग्ज आता करा किंवा मरो अशा स्थितीत आहे. लीग टप्प्यात शानदार कामगिरी करणारा आणि नंबर-१ स्थानावर राहिलेला पंजाब किंग्जचा संघ आता क्वालिफायर-२ सामना खेळेल ज्यामध्ये विजय हा त्यांच्यासाठी एकमेव पर्याय असेल. गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनिटेर सामन्यातील विजेत्या संघाबरोबर पंजाब दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.