Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: आयपीएलच्या चालू हंगामात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईला मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे, तर आरसीबी प्लेऑफच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पॉइंट टेबलमध्ये बंगळुरू सहाव्या, तर मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही आपल्या विक्रमांमध्ये सुधारणा करण्याची संधी असेल.

आयपीएलच्या चालू हंगामात विराट कोहलीने १० सामन्यात ६ अर्धशतकांसह ४१९ धावा केल्या असून आतापर्यंत १० झेलही घेतले आहेत. लीगमधील एकूण २०३ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १०३ झेल आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू किरॉन पोलार्डनेही तेवढेच झेल घेतले आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीने सामन्यादरम्यान एक झेल घेतला तर तो पोलार्डला मागे टाकून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. लीगमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनामो आयपीएलमध्ये २०४ सामन्यात १०९ झेल घेतले आहेत.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

मुंबईच्या कर्णधाराला ‘शतक’ झळकावण्याची संधी –

पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि त्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी आयपीएलचा सध्याचा हंगाम चांगला गेला नाही. मुंबईला १० पैकी ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हिटमॅनही आतापर्यंत बॅटने अपयशी ठरला आहे. रोहितने १० सामन्यांत केवळ १८४ धावा केल्या आहेत. मात्र, या सामन्यात मुंबईच्या कर्णधाराला ‘शतक’ झळकावण्याची संधी असेल.

हेही वाचा – IPL 2023: पंजाबविरुद्धच्या विजयानंतर केकेआरला मोठा फटका! बीसीसीआयने ‘या’ कारणासाठी नितीश राणावर केली कारवाई

रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९८ झेल घेतले आहेत आणि लीगमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. हिटमॅनला त्याचा जुना साथीदार किरॉन पोलार्डला मागे सोडायला वेळ लागेल, पण जर त्याने बंगळुरूविरुद्ध दोन झेल घेतले तर तो झेलचे शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होईल.

हेही वाचा – RCB vs MI: मागील आठ वर्षांपासून बंगळुरुचा सुरु आहे वाईट काळ, मुंबईविरुद्ध ‘हा’ कारनामा करण्यात आलं अपयश

आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा रुतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत १३ झेल घेतले आहेत. विराट कोहलीनंतर, एडन मार्कराम, जोस बटलर आणि हेटमायर हे या मोसमात ९-९ झेल घेऊन अव्वल क्षेत्ररक्षकांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. बंगळुरू आणि मुंबई यांच्यातील शेवटच्या सामन्यात आरसीबीने ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्याचवेळी रोहित शर्मा १० चेंडू खेळून एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.