Rohit Sharma Reaction on Saved by DRS Video: मुंबई इंडियन्सचा संघ जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळत आहे. २०१२ नंतर मुंबई इंडियन्सचा संघ जयपूरच्या मैदानावर जिंकलेला नाही. त्यामुळे मुंबईचा संघ या सामन्यात कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर मुंबईला फलंदाजीसाठी बोलावले. दरम्यान रोहित शर्मा ७ धावांवर बाद होता होता थोडक्यात वाचला. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

फजलहक फारूकी डावातील दुसऱ्याच षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटरातील चौथ्या चेंडूवर रोहितने चौकार लगावला. यानंतर पाचवा चेंडू जाऊन रोहितच्या मांडीला लागला, जो बरोबर स्टम्पसमोर होता. मैदानावरील पंचांनी रोहित शर्माला पायचीत झाल्याने बाद दिलं. रोहितलाही तो बाद वाटलं. पण रायन रिकल्टनबरोबर चर्चा करत रोहितने १ सेकंद असताना रिव्ह्यू घेतलाच.

रोहितने रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यूमध्ये रोहितची बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे रोहित बाद होणार का अशी भिती सर्वांच्या मनात होती. पण बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू पिचिंग आऊटसाईड ऑफ होता. चेंडूचा ५० टक्के भाग त्या लाईनच्या आतमध्ये असणं नियमांनुसार गरजेचं असत. पण चेंडूचा बराचसा भाग या लाईनच्या बाहेर असल्याने रोहित शर्मा नाबाद राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाबाद राहिल्यानंतर रोहित शर्माने आपला क्लास दाखवत अजून एक अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा ३६ चेंडूत ९ चौकारांसह ५३ धावांची खेळी करत माघारी परतला. तर रायन रिकल्टनबरोबर रोहितने ७१ चेंडूत ११७ धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीरांची यंदाच्या हंगामातील मोठी भागीदारी होती.