IPL 2024, RR vs LSG Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: आयपीएलच्या डबल हेडरमधील आजचा म्हणजेच २४ मार्चचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ हंगामातील पहिला सामना खेळत आहेत. त्यामुळे राजस्थान आणि लखनऊ या दोन्ही संघांते लक्ष्य विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यावर असेल.

RR vs LSG: पिट रिपोर्ट

सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तर या मैदानावर गोलंदाजांना मदत मिळते. या मैदानावर ५२ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ सामने जिंकले. या मैदानावर सर्वाधिक २१७ धावा आणि सर्वात कमी धावसंख्या ५९ धावा आहे.

kl rahul
IPL 2024 : लखनऊसमोर आज चेन्नईचे आव्हान
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL 2024 LSG vs PBKS Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
LSG vs PBKS Match Preview: शिखर धवनच्या पंजाब किंग्सच्या आव्हानासमोर केएल राहुलचा लखनऊ संघ विजयाचं खातं उघडणार?

RR vs LSG: हेड टू हेड

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध लखनऊ यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. यामध्ये राजस्थानने दोनदा तर लखनऊने एकदा विजय मिळवला आहे. पण लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२३ च्या २६व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला आणि आता राजस्थानला त्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

RR vs LSG: राजस्थान आणि लखनऊची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल संघासाठी सलामीसाठी उतरतील. तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. RR च्या मधल्या फळीत कॅरिबियन टच दिसेल. रोव्हमन पॉवेल आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. ध्रुव जुरेल यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट हे गोलंदाजी युनिट सांभाळतील.

लखनऊ सुपर जायंट्सकडून क्विंटन डी कॉक आणि देवदत्त पडिक्कल डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. कर्णधार केएल राहुल, निकोलस पुरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस आणि कृणाल पांड्यासारखे फलंदाज मधल्या फळीत खेळताना दिसतील. तर गोलंदाजीत नवीन उल हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई असतील.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान, ट्रेंट बोल्ट.

लखनऊ सुपर जायंट्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई.