मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे चर्चेत आहे. अर्जुन तेंडुलकरने रविवारी(१६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात त्याने पहिल्याच षटकात गोलंदाजी करत केवळ चार धाव्या दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मंगळावारी (१८ एप्रिल) झालेल्या सामन्यात अर्जुनला पहिली विकेट मिळाली. अर्जुनने सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारला झेलबाद केलं. या सामन्यात त्याने २.५ षटकांत १८ धाव्या दिल्या. अर्जुनला पहिली विकेट मिळाल्यानंतर त्याची बहीण व सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा>> …आणि अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट! शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजीची दाखवली झलक

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अर्जुनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “या दिवसासाठी खूप वेळ वाट पाहिली. मला तुझा खूप अभिमान वाटतो,” असं कॅप्शन साराने या स्टोरीला दिलं आहे. या स्टोरीमध्ये साराने अर्जुनला टॅगही केलं आहे.

हेही वाचा>> IPL 2023 MI vs SRH: अर्जुनने घेतला सचिन तेंडुलकरचा बदला, वडिलांना शून्यावर बाद करणाऱ्या ‘या’ खेळाडूची घेतली विकेट

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभावाला सामोरे जावे लागले. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १४ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. तर हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara tendulkar shared insta story after arjun tendulkar get his first wicket in ipl 2023 mi vs srh kak
First published on: 19-04-2023 at 15:19 IST