Shikhar Dhawan And Punjab Kings Players At Dharamshala Mountain Video Viral : जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू म्हणून शिखर धवनला ओळखलं जातं. धवन सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतो. तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. आयपीएल २०२३ च्या पुढील सामन्यासाठी पंजाब किंग्जचा संघ धर्मशाला पोहोचला आहे. धर्मशाला येथील एका डोंगरावर जाऊन धवनने खेळाडूंसह धमाल केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
पंजाब किंग्जचा संघ त्यांचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात धर्मशाला येथे होणार आहे. त्यामुळे संघातील खेळाडू धर्मशाला येथे पोहोचले आहेत. धर्मशाला भारतातील एक सुंदर ठिकाण म्हणून नावाजलेलं आहे. हे ठिकाण क्रिकेटच्या सुंदर वेन्यूपैकी एक आहे. याचदरम्यान शिखर धवननेही सराव सत्रातून फावळा वेळ काढून डोंगरावर सहकारी खेळाडूंसोबत फेरफटका मारला आणि एका प्रसिद्ध इन्स्टाग्राम ट्रेंडला फॉलो केलं.
या ट्रेंडमध्ये हे खेळाडू आधी एकत्र दिसतात आणि त्यानंतर उंच डोंगरावर जाऊन वेगवेगळ्या पोज देताना दिसतात. या व्हिडीओत शिखर धवन खूप शांत असल्यासारखा दिसत आहे. कॅमेराचा अॅंगल वरच्याबाजूनं घेतल्यावर शिखर याच ट्रेंडला फॉलो करताना दिसत आहे. धर्मशालाच्या या सुंदर ठिकाणी शिखर धवन मित्रांसोबत धमाल करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. डोंगरावर जाऊन या खेळाडूंनी जबरदस्त पोज दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिखरने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, हॅलो धर्मशाला…शिखर धवनच्या या व्हिडीओला हरभजन सिंगने प्रतिक्रिया देत म्हटलं, शिखर एक ट्रेंडसेटर आहे.