Sunrisers Hyderabad top score in IPL History: सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२४ मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करताना दिसत आहे. चिन्नास्वामीच्या मैदानावर हैदराबादच्या संघाने अवघ्या २० दिवसांत सर्वाधिक धावा करण्याचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. या संघाने २७ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा करून १७ वर्ष जुना विक्रम मोडला होता. आता आरसीबी विरुद्धच्या सामन्यात २८७ धावा करत आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. ट्रॅव्हिस हेडने एसआरएचसाठी शानदार शतक झळकावले. त्याने अवघ्या ४१ चेंडूत १०२ धावांची खेळी केली.

हैदराबादच्या फलंदाजांकडून बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई –

हैदराबादच्या अनेक फलंदाजांनी मिळून हे मोठे लक्ष्य दिले आहे. सर्वप्रथम, अभिषेक शर्माने सुरुवातीला २२ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने या मोसमातील चौथे शतक झळकावले आहे. हेड बाद झाल्यावर धावांवर नियंत्रण येईल असे वाटत होते, पण फलंदाजीला आलेल्या हेनरिक क्लासेननेही त्याच शैलीत खेळ सुरू ठेवला. त्याने ३१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ७ षटकार मारले गेले. याशिवाय एडन मार्करमनेही अप्रतिम फलंदाजी करत १७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ

या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांचा चांगलीच धुलाई झाली. बंगळुरूचा गोलंदाज रीस टोपलीने ४ षटकांत ६८ धावा दिल्या. याशिवाय आरसीबीकडून पदार्पण करणारा खेळाडू लॉकी फर्ग्युसनचया षटकातही धावांचा पाऊस पडला. फर्ग्युसनने या सामन्यात ४ षटकात ५२ धावा दिल्या. यश दयालनेही ४ षटकात ५१ धावा दिल्या. विजयकुमारच्याही ४ षटकांत ६४ धावा खर्च केल्या.

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या –

२८७/३ – एसआरएच वि आरसीबी, बंगळुरू, २०२४
२७७/3 – एसआरएच वि एमआय, हैदराबाद, २०२४
२७२/७ -केकेआर वि डीसी, विझाग, २०२४
२६३/५ -आरसीबी वि पीडब्ल्यीआय, बंगळुरू, २०१३
२५७/७ -एलएसजी वि पीके, मोहाली २०२३

टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या -़

३१४/३ -नेपाळ वि मंगोलिया, हांगझोऊ २०२३
२८७/3 – एसआरएच वि आरसीबी, बंगळुरू २०२४
२७८/३ -एएफजी वि आयर्लंड, डेहराडून २०१९
२७८/४ -झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इफ्लोव्ह २०१९
२७७/३ – एसआरएच वि एमआय, हैदराबाद २०२४

हेही वाचा – IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार –

२२ -एसआरएच वि आरसीबी, बंगळुरू २०२४
२१ -आरसीबी विरुद्ध पीडब्ल्यूआय, बंगळुरू २०१३
२० -आरसीबी वि जीएल, बंगळुरू २०१६
२० – डीसी विरुद्ध जीएल, दिल्ली २०१७
२० -एमआय विरुद्ध एसआरएच, हैदराबाद २०२४