Sunil Gavaskar Statement On Rohit Sharma : आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा धावांसाठी संघर्ष करत आहे. मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्मा डक आऊट झाल्याने मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात रोहित तीन नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र, मिडल ऑर्डरमध्ये तो तीन चेंडूपेक्षा जास्त खेळू शकला नाही. दिपक चहरच्या गोलंदाजीवर रोहितने पॉईंटच्या दिशेनं मारलेला चेंडू जडेजाने पकडला आणि रोहित झेलबाद झाला.

रोहितबाबत प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने विश्रांती घेतली पाहिजे. ७ जून ते ११ जून दरम्यानत इंग्लंडच्या ओवल मैदानात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर रोहितने फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे. तो काही सामन्यांसाठी पुन्हा वापसी करू शकतो. पण सध्याच्या घडीला त्याने काही काळ विश्रांती घेणं आवश्यक आहे.”

नक्की वाचा – विराट कोहली RCB साठी खेळणार नाही? केविन पीटरसनच्या ‘त्या’ ट्वीटमुळं क्रीडाविश्वात खळबळ, म्हणाला,”आता घरवापसी…”

गावसकर पुढे म्हणाले, चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात रोहितचा तो शॉट एका कर्णधाराची खेळी नव्हती. जेव्हा संघ अडचणीत असतो, तेव्हा कर्णधाराने जबाबदारीनं खेळलं पाहिजे. संघाला चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या फलंदाजीची आवश्यकता असते. सुरुवातीलाच दोन फलंदाज बाद झाले होते आणि तुम्ही स्वत: फॉर्ममध्ये नाही. मागच्या सामन्यात शून्यावर बाद झाले असताना स्कूप शॉट मारण्याची आवश्यकता नव्हती. एक-दोन धावा काढून खेळपट्टीवर टीकून राहणं महत्वाचं असतं. रोहितने विश्रांती घेतल्यानंतर काही गोष्टी सकारात्मक घडू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर आयपीएलमध्ये सर्वात जास्त १६ वेळा डक आऊट होण्याचा लाजिरवाण्या विक्रमाची रोहितच्या नावावर नोंद झाली. रोहित आता सर्वात जास्त वेळा डक आऊट होणाऱ्या सुनील नारायण, मनदीप सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्या लिस्टमध्ये सामील सामील झाला आहे.