Gujarat Titans players arguing with the umpire : आयपीएल २०२४ मधील २१ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनऊचा संघ प्रथम फलंदाजी केली. लखनऊच्या संघाची फलंदाजी सुरु असता थोडा वाद झाला. हा वाद डीआरएस संदर्भात घडला. यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि इतर काही खेळाडू अंपायरशी भिडले. यावेळी शुबमन गिलने मैदानावरील अंपायरला प्रश्नही विचारताना दिसला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कशावरुन झाला वाद?

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकात लखनऊच्या क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल लखनऊकहून क्रिजवर फलंदाजीसाठी आला. गुजरातसाठी उमेश यादव पहिले षटक टाकत होता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू पडिक्कलच्या पॅडला लागला.

त्यावर उमेश यादवने जोरदार अपील केले होते, पण अंपायरने त्याला नॉटआउट घोषित केले. यानंतर शुबमन गिलला उमेश यादवने डीआरएस घेण्यास सांगितले. त्यानंतर तिसऱ्याने अंपायरने अल्ट्राएज न चेक करता पडिक्कलला नॉटआउट घोषित केले. ज्यावरून कर्णधार शुबमन गिल आणि इतर खेळाडू चांगलेच संतापले आणि मैदानावरील अंपायरशी भिडले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका

सामन्याबद्दल बोलायचे तर लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५ गडी गमावून १६३ धावा केल्या. यासह गुजरात टायटन्सला विजयासाठी १६४ धावा कराव्या लागतील. लखनऊसाठी अष्टपैलू फलंदाज मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, त्याने ४३ चेंडूत ५८ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. दुसरीकडे कर्णधार केएल राहुलने ३१ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. आयुष बडोनीने ११ चेंडूत २० धावा केल्या, मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही.

हेही वाचा – VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’

१५ षटकांनंतर लखनऊची धावसंख्या ४ बाद ११४ धावा होती, मात्र निकोलस पुरणने २२ चेंडूत ३२ धावांची खेळी करत लखनऊला १६३ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. स्पेन्सर जॉन्सनच्या शेवटच्या षटकात एक षटकार आला, पण संपूर्ण षटकात त्याने केवळ ८ धावा देऊन एलएसजीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. शेवटच्या ५ षटकांमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी ४९ धावा जोडल्या आणि एलएसजीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.