Ruturaj Gaikwad takes amazing catch of Shankar: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी, २३ मे रोजी खेळला गेला. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने १५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. संघाच्या वतीने ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६० धावांची शानदार खेळी केली. या खेळीनंतर गायकवाडने विजय शंकरचा अप्रतिम झेला घेतला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडने विजय शंकरचा अप्रतिम झेल पकडला, ज्याची आता चर्चा होत आहे. वास्तविक, गायकवाडने झेल घेताना डायव्हिंग केले होते, तो झेल पाहून बॉल कुठेतरी जमिनीला स्पर्श करत असल्याचे एका दृष्टीक्षेपात दिसले. यामुळे मैदानावरील पंचांनी या निर्णयासाठी तिसऱ्या पंचाकडे जाणे योग्य मानले.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट

त्याचवेळी, टीव्ही रिप्लेमध्ये प्रत्येक कोनातून पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचाने कॅच योग्य ठरवला आणि शंकरला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे गुजरातच्या चाहत्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गायकवाडच्या झेलवर चाहते आपापसात प्रश्न उपस्थित करत आहेत.मात्र, या झेलबाबत फलंदाज विजय शंकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गायकवाडने झेल घेताच विजय शंकर स्वत:हून पॅव्हेलियनकडे जाताना दिसला. विजयने झेल घेण्याबाबत पंचांशी कोणतेही संभाषण केले नाही. पण गुजरातचे चाहते अंपायरबद्दल वेगवेगळे ट्विट करत आहेत.

CSK vs GT Qualifier 1: दीपक चहरने फलंदाजाला ‘मांकडिंग’ करण्याचा प्रयत्न करताच धोनीने दिली प्रतिक्रिया, VIDEO होतोय व्हायरल

गायकवाडच्या झेलवर गुजरातचे चाहते खूश नसले तरी या झेलने सामन्याला कलाटणी दिली. कारण एकेकाळी विजय शंकर आणि राशिद खान वेगवान फलंदाजी करत होते. शेवटच्या चेंडूपर्यंत गुजरात सामना जिंकू शकेल, असे वाटत होते, मात्र निर्णायक प्रसंगी मथीशा पथिरानाने विजय शंकरला ऋतुराजकरवी झेलबाद करून सामन्याचे चित्र बदलले. शंकरने १० चेंडूत १४ धावांची खेळी खेळली.

हेही वाचा – CSK vs GT Qualifier 1: दीपक चहरने फलंदाजाला ‘मांकडिंग’ करण्याचा प्रयत्न करताच धोनीने दिली प्रतिक्रिया, VIDEO होतोय व्हायरल

त्याचवेळी ऋतुराजच्या या झेलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कठीण खेळपट्टीवर ऋतुराजने ६० धावांची खेळी खेळली, तर दुसरीकडे असा अप्रतिम झेल घेत सीएसकेला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऋतुराजला त्याच्या शानदार खेळासाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.