आयपीएलच्या ४९ व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने चांगली सुरुवात केली. मात्र हुकुमी फलंदाज विराट कोहली बाद झाल्यामुळे बंगळुरु संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. मोईन अलीने विराटला क्लीन बोल्ड केलं. विशेष म्हणजे मोईनने बाद केल्यामुळे विराटचे एक स्वप्न अधुरेच राहिले.

हेही वाचा >>> विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी २०० क्लबमध्ये, आयपीएलमध्ये ‘असा’ विक्रम करणारे फक्त दोघे!

विराटचे स्वप्न राहिले अपुरे

विराट कोहलीने बंगळुरु संघाकडून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याने बंगळुरु संघाकडून आतापर्यंत अनेकवेळा मोठी खेळी केलेली आहे. चेन्नई संघाविरोधात खेळताना त्याने ९४९ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने ५१ धावांची अर्धशतकी खेळी खेळली असती तर एकट्या चेन्नईविरोधात खेळताना त्याच्या १००० धावा पूर्ण झाल्या असता.

याच कारणामुळे विराट कोहली आजच्या सामन्यात मोठ्या आत्मविश्वासाने खेळत होता. सुरुवातीपासून तो मोठे फटके मारत धावफलक खेळता ठेवत होता. मात्र दहाव्या षटकात मोईन अलीने त्याला क्लीन बोल्ड केले आणि त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. कोहली ३३ चेंडूंमध्ये ३० धावा करु शकला. चेन्नईविरोधात खेळताना १००० धावा करण्याचे कोहलीचे स्वप्न आज अपुरेच राहिले.

हेही वाचा >>> क्रिकेटपटू वृद्धिमान साहा धमकी प्रकरण, पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी

दरम्यान, विराट कोहलीव्यतिरिक्त फॅफ डू फॅफ ड्यू प्लेसिसनेही समाधानकारक खेळी केली. त्याने ३८ धावा केल्या. त्यानंतर महिपाल लॉमरॉर आणि रजत पाटीदार या जोडीने धावफलक फिरता ठेवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.