Naveen Ul Haq Instagram After RCB vs GT: आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. विराट कोहलीने फलंदाजीत चमकदार कामगिरी करून या सामन्यातही शतकी खेळी केली. परंतु, विजयासाठी या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा पगडा भारी ठरला आणि अखेरीस गुजरातने ४ विकेट्स गमावत १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. कालच्या मॅचनंतर विराट कोहलीने हातातोंडाशी आलेला घास गमावाल्याच्या दुःखात अनेकांनी ट्वीट पोस्ट केले आहेत. पण या सगळ्यात एका माणसाला मात्र चांगलाच आनंद झाल्याचे दिसतेय, अर्थात तो म्हणजे नवीन उल हक.

यंदाच्या आयपीएल मधील सगळ्यात तापलेले भांडण म्हणजे विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर व नवीन उल हक. हे भांडण एका सामन्यात संपलं असलं तरी त्यावर प्रतिक्रिया या अजूनही सुरु आहेत. अनेकदा नवीन विराटला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याच्या अशा पोस्टमुळे मागे त्याच्याच संघातील निकोलस पुरनने सुद्धा नवीनची मस्करी केली होती. यावेळेस तर आरसीबीच्या पराभवानंतर नवीनने मिळालेली संधी अजिबात सोडलेली नाही. नवीनने टाळ्या वाजवत जोरजोरात हसणारे एक मीम टेम्प्लेट शेअर केले आहे. नवीनच्या या स्टोरीनंतर साहजिकच विराटच्या चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल करायला सुरवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन उल हक स्टोरी

विराटच्या चाहत्यांनी नवीनला खडसावलं

दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स याआधीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात करून IPL 2023 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. आता आरसीबीचे यंदाच्या वर्षातील प्लेऑफला पोहोचण्याचे स्वप्न भंग झाले आहे तर मुंबई इंडियन्सने गुजरातच्या बळावर प्लेऑफ मध्ये दमदार एंट्री घेतली आहे.