Virat Kohli’s post for Coach Rajkumar Sharma: भारतीय आणि आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्यासाठी एक पोस्ट पोस्ट केली आहे. विराट कोहलीची इन्स्टाग्रामवरील ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विराट कोहली त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मासोबत दिसत आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काही लोकांसाठी खेळ हा दुसऱ्या स्थानी असतो, असे लोक खेळापूर्वी तुमच्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळे अशा लोकांसोबत सेलिब्रेट करणे गरजेचे आहे.

राजकुमार सरांचा मी सदैव ऋणी राहीन – विराट

विराट कोहलीने पुढे लिहिले की, “मी राजकुमार सरांचा नेहमीच ऋणी राहीन. ते माझ्यासाठी फक्त प्रशिक्षकच नाही, तर माझे मेंटॉर राहिले आहे, ज्यांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला साथ दिली.” विराटने पुढे लिहिले, “लहानपणी माझे फक्त एक स्वप्न होते… पण राजकुमार शर्मा सरांच्या विश्वासाने मला सक्षम बनवले. अशाप्रकारे, जवळपास १५ वर्षांनंतर मी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये आहे. प्रत्येक सल्ल्याबद्दल आणि शिकवणीसाठी मी राजकुमार सरांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे स्वप्न आपल्या खांद्यावर घेतले, यासाठी मी राजकुमार सरांचे आभार मानू इच्छितो.”

ही माझ्या प्रशिक्षकाची कहाणी आहे –

माजी भारतीय कर्णधाराने लिहिले की, ही माझ्या प्रशिक्षकाची कहाणी आहे, पण आता मला तुमच्या प्रशिक्षकाची कहाणी जाणून घ्यायला आवडेल. त्यानी लिहिले आहे की, तुमचा मित्र, पालक, खेळाडू, तुम्हाला पाठिंबा देणारी, प्रोत्साहन देणारी, तुम्हाला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी कोणतीही व्यक्ती, अशा लोकांबद्दल सांगा. तसेच, त्याने लिहिले की, इंस्टाग्रामवर #LetThereBeSport सह तुमच्या गुरूबद्दल सांगा. दरम्यान, विराट कोहलीचा प्रशिक्षक राजकुमार शर्मासोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय चाहते सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – VIDEO: ‘या’ खेळाडूला पाहून माहीभाईची प्रतिमा आठवते; फिरकीपटू युजवेंद्र चहलचे वक्तव्य

विराट कोहलीची आयपीएल २०२३ मधील कामगिरी –

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या मोसमात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. विराट कोहलीने या मोसमात ११ सामन्यात ४२ च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. विराट व्यतिरिक्त फक्त फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फलंदाजीत आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता उर्वरित तीन सामन्यांमध्ये संघाच्या उर्वरित खेळाडूंनाही जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे.