scorecardresearch

Premium

MS Dhoni on Chahar: जर्सीवर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलेल्या दीपक चाहरचा एम.एस. धोनीने लावले पळवून, सामन्यानंतरचा Video व्हायरल

IPL Final 2023: चेन्नईचा संघ विजेता झाल्यानंतर दीपक चाहर कर्णधार धोनीला जर्सीवर ऑटोग्राफ मागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये धोनी त्याला ऑटोग्राफ देण्यास स्पष्टपणे नकार देताना दिसला.

IPL 2023: Deepak Chahar behind Dhoni for autograph on jersey captain also forced in front of fast bowler's insistence
धोनीने चाहरच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला आणि त्याल मिठी मारली. सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

MS Dhoni And Deepak Chahar, IPL Final 2023: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्स विरुद्धच्या १६व्या हंगामातील अंतिम सामन्यात, रवींद्र जडेजाने चौकार सीएसकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला. डकवर्थ-लुईस नियमांनुसार चेन्नईने ५ गडी राखून हा विजय मिळवला त्यात जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर चेन्नईचे खेळाडू एकीकडे खूप आनंदी दिसत होते. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी आणि दीपक चाहर यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी दीपक चाहरला त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ देण्यास स्पष्ट नकार देताना दिसला. यादरम्यान धोनीने काहीशी नाराजीही व्यक्त केली, मात्र तो पूर्णपणे विनोदाच्या मूडमध्ये होता, त्याचा हा मजेशीर अंदाज चाहत्यांना फार आवडत आहे. यादरम्यान माहीने मॅचमध्ये कॅच सोडल्याबद्दल दीपकला काही टोमणे देखील मारले.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, चाहर ऑटोग्राफसाठी धोनीकडे जाताना दिसत आहे परंतु थालाने त्याची फिरकी घेतली आणि त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ करण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये धोनी चाहरला झेल सोडले यावरून चेष्टा-मस्करीत बोलताना काही संकेत देताना दिसत आहे. एवढे असूनही चाहर धोनीला त्याचा ऑटोग्राफ मागत राहिला. यानंतर राजीव शुक्लाही यात सामील झाले आणि त्यांनी धोनीला समजावून सांगितले. राजीव शुक्ला यांनी सांगितल्यानंतर धोनीने चाहरच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला, अखेर काही क्षणांनंतर चाहरच्या हट्टापुढे माहीने हसून त्याला मिठी मारली.  या सामन्यात चाहरने शुबमन गिलचा सोपा झेल सोडला. झेल सोडल्यानंतर गिलने ३६ धावा करत गुजरातला चांगली सुरुवात करून दिली.

आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सनी पराभव केला. मंगळवारी चेन्नई संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईने सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि रवींद्र जडेजाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खास खेळी खेळावी लागली.

बी साई सुदर्शनने ४७ चेंडूत ९६ धावा करत गुजरात टायटन्सला फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ४ बाद २१४ धावा करता आल्या. पावसामुळे खेळात व्यत्यय आल्याने चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर मोहित शर्माच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार मारून सीएसकेला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2023: कॅप्टन कूल धोनी मुंबईच्या रुग्णालयात दाखल होणार; IPLच्या पहिल्या सामन्यापासून करत होता ‘या’ दुखापतीचा सामना!

अंतिम सामन्यात दीपक चाहर गोलंदाजीत कमी पडला

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची कामगिरी काही खास नव्हती. विजेतेपदाच्या सामन्यात ४ षटकांच्या गोलंदाजीदरम्यान दीपक चाहरला ३८ धावांत केवळ १ विकेट घेता आली. दीपकच्या या मोसमातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने १० सामन्यांत २२.८४च्या सरासरीने एकूण १३ विकेट्स घेतल्या. या हंगामात चेन्नईसाठी तुषार देशपांडेने सर्वाधिक २१ बळी घेतले आणि त्यानंतर रवींद्र जडेजाने २० बळी घेतले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 14:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×