Ruturaj Gaikwad Takes David Warners Jaw Dropping Catch : आयपीएल २०२३ चा ६७ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २० षटकात ३ विकेट्स गमावत २२३ धावा कुटल्या होत्या. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळं चेन्नईला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण उडाली अन् १४६ धावांवर ९ विकेट्स गमावत या सामन्यात त्यांचा पराभव झाला.

कर्णधार डेव्हिड वॉर्नरने धावांचा पाऊस पाडत दमदार अर्धशतक ठोकलं. परंतु, वॉर्नरला त्याच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. कारण वॉर्नर ८६ धावांवर असताना मथिशा पाथिरानाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. वॉर्नर शतकाच्या उंबरठ्यावर असताना ऋतुराज गायकवाडने हवेत उडी मारून वॉर्नरचा अप्रतिम झेल घेतला. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – CSK vs DC: वॉर्नरने बॅटने तलवारबाजी करत जडेजाची उडवली खिल्ली, ‘त्या’ चेंडूवर वॉर्नर कसाबसा वाचला, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडने अप्रतिम फलंदाजी करून ५० चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीनं ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसंच कॉन्वेनंही ५२ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीनं ८७ धावा कुटल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर शिवम दुबेचं वादळ आलं. दुबेनं ९ चेंडूत २२ धावांची खेळी साकारली. तर जडेजानेही धडाकेबाज फलंदाजी करून ७ चेंडूत २० केल्या. धोनी ५ धावांवर नाबाद राहिला.