Sachin Tendulkar gave important advice to the Mumbai team: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (आयपीएल २०२३), मुंबई इंडियन्स (एमआय) ने मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने पहिले अर्धशतक झळकावले. ज्यामुळे मुंबईने १९२ धावा केल्या. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या कॅमेरून ग्रीनने नटराजनच्या षटकात ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. या विजयानंतर सचिन तेंडुलकरने मुंबई संघाला महत्वाचा सल्ला दिला आहे.

कॅमेरून ग्रीनच्या ४० चेंडूतील नाबाद ६४ धावांच्या खेळीचे मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने कौतुक केले. तो म्हणाला की ग्रीनने अहंकाराला आपल्यावर वरचढ होऊ दिले नाही. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये संबोधित करताना त्याने ग्रीनच्या खेळीतून शिकण्यास सांगितले. तो म्हणाला की अहंकार नेहमी चुकीच्या गोष्टी करायला लावतो.

अहंकार तुम्हाला नेहमी चुकीचे काम करायला लावतो –

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला, “मला वाटते की मी आजपर्यंत जे काही शिकलो आणि मला वाटते की आपल्या सर्वांना ग्रीनकडून संदेश मिळाला आहे. तो संघातील इतर खेळाडूंप्रमाणे लांबलचक शॉट्स खेळू शकतो, पण त्याला सुरुवातीच्या काळात अडचणी आल्या.त्यावेळी त्याने त्याचा अहंकार त्याच्यावर वरचढ ठरु दिला नाही. अहंकार तुम्हाला नेहमी चुकीच्या गोष्टी करायला लावतो. ग्रीनने असे काही केले नाही.”

हेही वाचा – LSG vs RR: लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थानच्या ‘या’ खेळाडूच्या हेलिकॉप्टर शॉटने निर्माण केली दहशत, पाहा VIDEO

आपण कदाचित १९२ पर्यंत पोहोचू शकलो नसतो –

सचिन तेंडुलकर कॅमेरून ग्रीनबद्दल पुढे म्हणाला, “त्याने संघाचे हित लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडला. तो खराब फटके खेळू शकला असता. कुणास ठाऊक, तो आऊट झाला असता तर आपण १९२ पर्यंत पोहोचलो नसतो. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नाला दाद द्यायला हवी असे मला वाटते. ही एक खास खेळी होती.”

हेही वाचा – IPL 2023 Fixing: धक्कादायक! मोहम्मद सिराजशी ‘सट्टेबाजाने’ साधला संपर्क, बीसीसीआयकडे पोहोचली तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅमेरून ग्रीन डेथ ओव्हर बॉलिंगवर काम करत आहे –

याआधी सादरीकरणात ग्रीन म्हणाला, “मला वाटते की पहिले काही सामने माझ्यासाठी आणि आमच्या संघासाठी शिकण्याचा काळ होता. जेव्हा मी फलंदाजीला आलो होतो, तेव्हा थोडी कठीण परिस्थिती होती. पण योजना यशस्वी झाल्याचा आनंद आहे. मी डेथ ओव्हर्समध्ये माझ्या गोलंदाजीवर काम करत आहे. आशा आहे की आम्ही ही गती कायम ठेवू.”