Lucknow Super Kings vs Sunrisers Hyderabad Match Update : आयपीएल २०२३ मध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून यंदाच्या लीगमध्ये जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वच संघांममध्ये रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये एक लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आहे. के एल राहुलच्या संघाने आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय संपादन केलं आहे. आता लखनऊचा संघ घरेलू मैदानात उतरणार असून आज सनरायझर्स हैद्राबादशी भिडणार आहे. दोन्ही संघ इकाना स्टेडियममध्ये आमने-सामने असणार आहेत. पण याआधी लखनऊच्या सलामी जोडीबाबत जोरदार चर्चा रंगली असून के एल राहुल या सामन्यात नेमकी कोणती भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

दोन सामन्यानंतर आता लखनऊच्या संघात क्विंटन डिकॉक सामील झाला आहे. त्याच्या अनुपस्थित के एल राहुलसोबत केली मायर्स सलामीला आला होता. दोन्ही सामन्यात केली मायर्सने धडाकेबाज फलंदाजी करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मायर्सने पहिल्या सामन्यात ३८ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसंच दुसऱ्या सामन्यातही चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं. पण तिसऱ्या सामन्यात क्विंटन डिकॉक सलामी करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर लखनऊ संघाचा स्टार फलंदाज दीपक हुड्डाने एक मोठा इशारा दिला आहे.

नक्की वाचा – खराब प्रदर्शनामुळं सुनील गावसकर कोलकाताच्या ‘या’ स्टार खेळाडूवर भडकले, म्हणाले, “काहीच केलं नाही आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिकॉक जबरदस्त खेळाडू आहे – दीपक हुड्डा

दीपक हुड्डाने सामन्याआधी माध्यामांशी बोलताना म्हटलं, “डिकॉक शानदार प्लेयर आहे. त्याच्या पुनरागमनानंतर संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल. मायर्स एक उमदा खेळाडू आहे. मायर्सने मागील सामन्यात संघाला धावांची वेगवान सुरुवात करून दिली. पण आमचा संघ त्याच्यावर अवलंबून नाहीय. संघात अनेक मोठे खेळाडू आहेत. जे विरोधी संघासमोर आव्हान उभं करण्यात सक्षम आहेत.”