Yuvraj Singh angry on Mandeep and Rinku Singh: आयपीएल २०२३ च्या २८ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी हंगामातील पहिला विजय नोंदवला. सलग पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली संघाला केकेआरविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. दिल्लीचा हा शानदार विजय होता. कारण या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांची अवस्था वाईट केली. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीने केकेआरचा संपूर्ण संघ २० षटकांत १२७ धावांत गारद केला. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने हे लक्ष्य ६ गडी गमावून शेवटच्या षटकात पूर्ण केले.

युवी मनदीप सिंग आणि रिंकू सिंगवर भडकला –

केकेआरच्या दिल्लीविरुद्धच्या कामगिरीवर युवराज सिंग खूपच नाराज दिसत आहे. युवराजने ट्विट करत कोलकात्याच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले आहेत. खासकरून युवी मनदीप सिंग आणि रिंकू सिंगवर भडकलेला दिसून आला. गेल्या काही सामन्यांमध्ये हे दोन्ही खेळाडू चांगल्या लयीत दिसले, पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू अतिशय स्वस्तात बाद झाले. रिंकू सिंगने ६ आणि मनदीप सिंगने १२ धावा केल्या.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

हेही वाचा – IPL 2023: ”… म्हणून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात अश्रू आले”, इयान बिशपचा मोठा खुलासा

काय म्हणाला युवराज सिंग?

या दोन्ही फलंदाजांवर आपला राग काढत युवराज सिंगने रिंकू आणि मनदीपवर आपली नाराजी व्यक्त केली. तो ट्विटमध्ये म्हणाला की, ”जेव्हा केकेआर संघ संघर्ष करत होता, तेव्हा मनदीप आणि रिंकूला खेळण्याची पद्धत बदलण्याची गरज होती, जेव्हा विकेट पडत होत्या तेव्हा अशावेळी भागीदारीची गरज होती. मग याआधी तुम्ही कितीही चांगली खेळी खेळली असो. रिंकू आणि मनदीप यांना १५ षटकांपर्यंत एकदिवसीय फॉर्मेटप्रमाणे फलंदाजी करणे आवश्यक होते. कारण आंद्रे रसेलला शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीसाठी येणार होता.” रिंकू आणि मनदीपच्या फलंदाजीवर तो अजिबात खूश नसल्याचे युवराज सिंगच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.

केकेआरची फलंदाजी डीसीच्या गोलंदाजांपुढे कोलमडली –

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंग आणि मनदीप यांच्याशिवाय केकेआरची संपूर्ण बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआरच्या संघाला २० षटकांत अघ्या १२७ धावा करता आल्या. यादरम्यान जेसन रॉयने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर आंद्रे रसेलने ३१ चेंडूत ३८ धावांची अत्यंत संथ खेळी खेळली. रसेलने आपल्या खेळीत १ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय लिटन दास (४), या मोसमातील दुसरे शतक झळकावणारा व्यंकटेश अय्यर (०), कर्णधार नितीश राणा (४) आणि सुनील नरेन केवळ ४ धावांचे योगदान देऊ शकले.