आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५२ व्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत पंजाब किंग्ज संघाने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला. पंजाबने वीस षटकांत १८९ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात राजस्थानकडून गोलंदाजी करणारा युझवेंद्र चहल याने धडाकेबाज गोलंदाजी केली. त्याने पंजाबच्या तीन फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> IPL 2022, LSG vs KKR : लखनऊचे खेळाडू दिसणार नव्या रुपात! ‘मदर्स डे’च्या निमित्ताने परिधान करणार खास जर्सी

युझवेंद्र चहलने पंजाबच्या तीन फलंदाजांना बाद करण्याची मोठी कामगिरी केली. त्याने सलामीला आलेला बेअरस्टो, मयंक अग्रवाल आणि भानुका राजपक्षे या आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. परिणामी पंजाबला २०० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. चहलने या हंगामात मोठ्या शिताफीने गोलंदाजी करत आतापर्यंत 22 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा >>> अफलातून जोस बटलर! हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, धवनला केलं बाद

चहलने मलिंगाला टाकलं मागे

युजवेंद्र चहलने आयपीएलच्या एका हंगामात चार वेळा २० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. त्याने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि सुनिर नरेन यांनादेखील मागे टाकलं आहे. लसिथ मलिंगा सध्या मुंबई संघासाठी वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. मलिंगाने आयपीएलच्या एकाच हंगामात तीन वेळा २० पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या आहेत. तर सुनिल नरेननेही तीन वेळा २० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. मात्र चहलने २० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी चार वेळा केली आहे. त्यामुळे त्याने मलिंगा आणि सुनिल नरेन या दिग्गजांना मागे टाकलं.

हेही वाचा >>> IPL 2022 च्या पुढील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हिरव्या जर्सीत उतरणार, जाणून घ्या कारण

आयपीएलच्या एका हंगामात २० पेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज

युझवेंद्र चहल- २०१५, २०१६, २०२०, २०२२
लसिथ मलिंगा- २०११, २०१२, २०१५
सुनिल नरेन- २०१२, २०१३, २०१४

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal takes 22 wickets in ipl 2022 break lasith malinga record prd
First published on: 07-05-2022 at 19:10 IST