Ishan Kishan Debut Test: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. टीम इंडियाने हा सामना तीन दिवसांतच जिंकल्याने यजमानांची चांगलीच निराशा झाली. डॉमिनिका येथील विंडसर पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. इशानने या सामन्यात केवळ एक धाव केली. मात्र, तो  या सामन्यात त्याच्या विकेटकीपिंगमुळे फार चर्चेत राहिला. पदार्पणाच्या कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीसारखाच स्टंपिंग करण्याची कृती केली, असे त्याने दोनदा केले. मात्र, दोन्ही वेळा इशानला अपयश आले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक इशान किशनने जेसन होल्डरला स्टंप आऊट करण्याची हुशारी दाखवली. मात्र फलंदाजाला यष्टीचित करण्यात त्याला अपयश आले. कारण चेंडू तो खेळला नव्हता आणि तो डेड बॉल ठरण्यात आला. वास्तविक, इशानने दोनदा असे कृत्य केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

KL Rahul Argues With Umpire in live match and Sledges Shivam Dube CSK vs LSG
IPL 2024: केएल राहुल लाइव्ह सामन्यात थेट पंचांवरच भडकला, दुबेलाही सुनावलं; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड

विंडीजच्या दुसऱ्या डावातील ३१व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हे पहिल्यांदा घडले. जडेजाचा चेंडू खेळताना जेसन होल्डर चुकला. त्यानंतर चेंडू विकेटकीपर इशानकडे गेला. त्याचवेळी इशानने इथे हुशारी दाखवली आणि होल्डर हलण्याची वाट बघत शांतपणे उभा राहिला. मात्र, होल्डरने पाय उचलले नाहीत आणि त्यामुळे तो नाबाद राहिला आणि इशानची चाल फसली.

हेही वाचा: IND vs WI: पहिल्या कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर यशस्वीबाबत रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला, “तो तयार आहे मात्र…”

यानंतर, दुसऱ्यांदा ३३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने होल्डरला थोडा बाहेर चेंडू टाकला, यावेळीही होल्डर फटका मारण्यास हुकला. त्यानंतर पुन्हा एकदा किशनने बेल्स काढण्यापूर्वी होल्डरचे पाय हवेत वर येण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर फलंदाजाचे पाय हवेत येताच इशानने बेल्स उडवून स्टंपिंगची अपील केली. होल्डरचा पाय हवेत होता पण तोपर्यंत अंपायरने पुढे खेळ सुरु करा असा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला डेड बॉल असे घोषित करण्यात आले. त्यामुळे होल्डर पुन्हा स्टंप आऊट होण्यापासून वाचला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल हो असून चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत.

विशेष म्हणजे अ‍ॅशेस २०२३ मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात अ‍ॅलेक्स कॅरीने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला अशाच प्रकारे बाद केले होते, ज्यामुळे यावर बराच वाद झाला होता. क्रीजमधून बाहेर आल्यानंतर कॅरीने दुरूनच थ्रो करून बेअरस्टोला यष्टीचीत केले होते. तोपर्यंत षटक संपले असे अंपायरकडून जाहीर न झाल्याने नियमानुसार तिसऱ्या अंपायरने बेअरस्टोला बाद ठरवले. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा खिलाडूवृत्तीच्या वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचा: Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरणार

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात केवळ १३० धावा करता आल्या. भारताकडून अश्विनने ७ विकेट्स घेतल्या. १७१ धावांच्या खेळीसाठी जैस्वालला सामनावीराचा किताब देण्यात आला.