IND vs WI Test 2023: कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला जात आहे, ज्याचा तीन दिवसांचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४३८ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने (वेस्ट इंडिज) ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या आहेत. मात्र, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार फलंदाज शुबमन गिल आणि इशान किशन यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या मिस वर्ल्ड अ‍ॅचे अब्राहमशी खास भेट घेतली.

इशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आहे. त्याचवेळी, शुबमन गिलला फलंदाजीत अजून सूर गवसलेला दिसत नाही. हे दोघेही कसोटीच्या पहिल्या डावात स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशान आणि शुबमन त्रिनिदाद आणि टोबॅगोची ‘मिस वर्ल्ड’ ‘अ‍ॅचे अब्राहम’सोबत दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, यावेळी त्रिनिदाद आणि टोबॅगोची मिस वर्ल्ड अ‍ॅचे अब्राहम खूप आनंदी दिसत आहे. या मुलाखतीत ती भारतीय क्रिकेटपटूंशी संवाद साधतानाचा मजामस्ती आणि आनंद दोन्ही शेअर करत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अ‍ॅचे अब्राहम ही शुबमन गिल, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत सेल्फी घेत आहे. हा मौजमस्तीचा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटो शेअर करत त्रिनिदाद अँड टोबॅगोची मिस वर्ल्डने लिहिले की, “भारतीय क्रिकेटपटूंना भेटून खूप आनंद झाला. माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.” या वर्षाच्या शेवटी मिस वर्ल्ड अब्राहम पहिल्यांदा भारतात येणार आहे. तिचा हा उत्साह तिने या तिघांबरोबर शेअर केला. शेवटी ती, “नमस्ते इंडिया” म्हणाली.

पावसाचा वारंवार व्यत्यय येऊनही भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. यामुळे भारत पहिल्या डावात २०९ धावांनी पुढे आहे. जेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अलिक अथानेझ (३७) जेसन होल्डर (११) हे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर टिकून आहेत. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती. मात्र, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी असे असतानाही सुंदर यश संपादन केले आणि सामन्यात भारताचा वरचष्मा कायम ठेवला. भारताकडून रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या, दुसरीकडे अश्विन, सिराज आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्याला साथ दिली. भारत आता खेळाच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून सामन्यातील आपली पकड मजबूत राहील.

हेही वाचा: Virat Kohli: “किंग कोहली म्हणजे ज्ञान-अनुभवाचे भांडार!” माजी पाकिस्तानी खेळाडूने बांधले विराटच्या कौतुकाचे पूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत इशान किशनने कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात त्याला केवळ एक नाबाद धावा करता आली असली तरी किशनने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फारशी चांगली खेळी करू शकला नाही, त्याने केवळ २५ धावा केल्या. दुसरीकडे, जर आपण गिलबद्दल बोललो, तर गिल काही काळापासून खूप चांगली कामगिरी करत आहे. पण पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गिल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.