माजी कर्णधार कपिल देव स्पष्टपणे सांगितले की, कर्णधारासाठी इतर अनेक गोष्टींसोबतच तंदुरुस्त राहणेही खूप महत्त्वाचे असते. तुम्ही फिट नसाल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. यासाठी रोहित शर्माला खूप मेहनत घ्यावी लागेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबत, एबीपी न्यूजच्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून कपिल देव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कपिल देव म्हणाले, “तो एक महान फलंदाज आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्याच्या फिटनेसबद्दल बोलता, तेव्हा तो थोडा जास्त वजनाचा दिसतो, किमान टीव्हीवर तरी. होय, जेव्हा तुम्ही एखाद्याला टीव्हीवर पाहता आणि नंतर वास्तविक जीवनात पाहिल्यावर ते वेगळे असू शकते. पण मी जे काही पाहतो, रोहित एक महान खेळाडू आणि उत्तम कर्णधार आहे, पण त्याने तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. विराटकडे बघा, जेव्हाही तुम्ही त्याला पाहता तेव्हा म्हणाल, काय फिटनेस आहे.”

१९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहित शर्मा हा क्रिकेट कौशल्याचा विचार करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. परंतु त्याच्या तंदुरुस्तीबद्दल असे म्हटले जाऊ शकत नाही.

हेही वाचा – All England Campaign: पी.व्ही. सिंधूला मदत करणार मलेशियाचा स्टार बॅडमिंटनपटू हाफिज हाशिम

कर्णधार असा असावा की सहकाऱ्यांना अभिमान वाटेल –

कपिल देव म्हणाले, “रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे, पण मला वैयक्तिकरित्या वाटते की त्याच्या फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो पुरेसा फिट आहे का? कारण कर्णधार असा असावा, जो इतर खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित करेल. संघातील खेळाडूंना त्यांच्या कर्णधाराचा अभिमान वाटला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये होणारा एकदिवसीय विश्‍वचषक –

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपदासाठी तयारी करत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान खेळल्या जाणार्‍या वनडे विश्वचषक स्पर्धेची हा १३ वा हंगाम असणार आहे. संपूर्णपणे भारताकडून आयसीसी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणारी ही पहिलीच स्पर्धा असेल.