India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रूटने १५० धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सने १४१ धावा केल्या. या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ३११ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांची तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान बुमराहच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महागडी स्पेल टाकली आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात १०० पेक्षा अधिक धावा खर्च केल्या आहेत. त्याला या डावात २ गडी बाद करण्यात यश आलं. पण यादरम्यान त्याने ११२ धावा केल्या. त्याने सर्वाधिक धावा खर्च केल्या असल्या तरीदेखील या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत १४ गडी बाद केले आहेत.
याआधी मेलबर्न कसोटीत त्याने ९९ धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत त्याने एकदाही १०० धावा खर्च केल्या नव्हत्या. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मेलबर्न कसोटीत त्याने ९९ धावा खर्च केल्या होत्या.
कसोटी क्रिकमेटमध्ये जसप्रीत बुमराहने टाकलेले महागडे स्पेल
१) २ गडी बाद ११२ धावा – मँचेस्टर २०२५
२) ४ गडी बाद ९९ धावा – मेलबर्न २०२४
३) ३ गडी बाद ८४ धावा – चेन्नई २०२१
४)५ गडी बाद ८५ धावा, नॉटिंघम २०१८
५) ५ गडी बाद ८४ धावा, चेन्नई २०२१
इंग्लंडची दमदार फलंदाजी
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला ३५८ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सने ४१, बेन डकेटने ९४, जॅक क्रॉलीने ८४, ऑली पोपने ७१ आणि कार्सने ४७ धावा केल्या. यासह इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या.