टी २० स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण?, याबाबत खलबतं सुरु आहे. आजी माजी क्रिकेटपटूंनी कुणाला कर्णधारपद द्यावं?, याबाबतची मतं व्यक्त केली आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावं आघाडीवर आहेत. आता माजी क्रिकेटपटू आशिष नेहराने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भारताचा पुढचा कर्णधार एक गोलंदाज असावा, असं सांगत जसप्रीत बुमराहचं नाव सुचवलं आहे. “गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाही, असं कोणत्याच पुस्तकात लिहिलेलं नाही.”, असंही आशिष नेहरा यांनी सांगितलं.

“भारताने मला कर्णधारपद न देता आधीच मोठी चूक केली आहे. आता ही चूक पुन्हा करू नये.”, असं आशिष नेहराने हसत सांगितलं. “कर्टनी वॉल्श, वसीम अक्रम, वकार यूनिस कर्णधार होते. तर एक गोलंदाज कर्णधार का होऊ शकत नाही? रोहित शर्मा व्यतिरिक्त केएल राहुल आणि ऋषभ पंच यांचं नाव आघाडीवर असल्याचं मी ऐकलं आहे. ऋषभ पंतने संपूर्ण जगात प्रवास केल आहे. तो मैदानात ड्रिंक्सही घेऊन गेला आहे आणि संघातून ड्रॉपही झाला आहे. दुसरीकडे केएल राहुलची संघात पुनरागमन झालं. कारण मयंक अग्रवाल जखमी झाला होता. त्यामुळे जसप्रीत बुमराह एक पर्याय ठरू शकतो. जसप्रीत बुमराह प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळतो. दुसरीकडे गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाही असं कुठे लिहिलं नाही”, असं आशिष नेहरा यांनी क्रिकबजशी बोलताना सांगितलं.

T20 WC:”अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर…”; शोएब अख्तरने न्यूझीलंडला डिवचलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने एका मुलाखतीत रोहितला टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. रोहितनंतर त्याने केएल राहुलचे नाव घेतले. रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली, जिथे त्याने मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच विजेतेपदे मिळवून दिली. टीम इंडियासाठी त्याच्या कर्णधारपदाच्या विक्रमांमध्ये निदाहास ट्रॉफी आणि आशिया कप २०१८ च्या विजयाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मायदेशातील मालिकेत हिटमॅनला संघाचे नेतृत्व मिळू शकते. १७ नोव्हेंबरपासून भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होत आहे.