आशिया चषक २०२३ च्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानकडे आहे. पीसीबी या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे, परंतु भारताने या स्पर्धेसाठी शेजारील देशात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.

२०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वीही जय शाह यांनी आपल्या एका वक्तव्यात ही गोष्ट स्पष्ट केली होती. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती, त्यानंतर पीसीबीचे नवे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.

wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नाही या निर्णयावर भारत ठाम असल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये हलवली जाऊ शकते, तर दुसरा पर्याय श्रीलंकेकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. जर पाकिस्ताननेही ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्णय बदलला नाही, तर यावेळी ही स्पर्धा टीम इंडियाशिवाय खेळवली जाऊ शकते.

हेही वाचा – धक्कादायक! दीपक चहरच्या पत्नीला लाखोंचा चुना लावत दिली जीवे मारण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “जय शाह एसीसीच्या बैठकीसाठी बहरीनमध्ये आहेत. बीसीसीआयची भूमिका बदलणार नाही. सरकारकडून आम्हाला कोणताही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने भारत पाकिस्तानला जाणार नाही.”

हेही वाचा – दीपक चहरच्या डोळ्यादेखत माकडाने पळवली भलतीच गोष्ट; VIDEO होतोय व्हायरल

५ जानेवारी रोजी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी २०२३-२४ मध्ये आशियामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी रोडमॅप जारी केला आहे. जय शाहच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली होती. वास्तविक, या रोडमॅपमध्ये आशिया चषक २०२३ चाही उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा – इम्रान ताहिरचे भारताबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ बाबतीत इंडियाचा कोणीच हात धरु शकत नाही

जो पाकिस्तानने आयोजित केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी जय शाह यांच्यावर आरोप केला होता की, ते या स्पर्धेचे आयोजन करत असतानाही पाकिस्तानचा सल्ला न घेता रोडमॅप जारी केला आहे. जय शाह यांनी किमान एक फोन तरी करायला हवा होता असेही त्यांनी म्हटले होते.