नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टीशी विवाहबंधनात अडकलेला भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल याला खराब फॉर्मचा फटका बसला आहे. सध्या चालू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये के. एल. राहुल फलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे राहुलच्या खराब फॉर्मबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. तसेच, राहुलला संघातून वगळण्याचाही सल्ला काहींनी दिला होता. या पार्श्वभूमीवर के. एल. राहुलची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून गच्छन्ती करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळे राहुलच्या संघातील स्थानाबाबतही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी झाली होती घोषणा!

डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली, तेव्हाच के. एल. राहुलची उपकर्णधार म्हणून घोषणा झाली होती. तेव्हा राहुलचा फॉर्मही चांगला होता. मात्र, दरम्यानच्या काळात राहुलला आपल्या कारकिर्दीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये तर राहुल पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून केली जात होती. काही चाहत्यांच्या मते तर राहुल द्रविडच के. एल. राहुलला पाठिशी घालत असल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे.

राहुलला धावा करण्यासाठी पर्याय शोधावे लागतील -रोहित

पुढचा उपकर्णधार कोण?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर टॉफी मालिकेमध्ये भारतानं चार सामन्यांमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ट्रॉफी भारताकडेच राहणार असल्याचंच स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला कमबॅक करण्यासाठी लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेत मोठा विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अव्वल कामगिरी करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आता कर्णधार रोहित शर्माची साथ देण्यासाठी उपकर्णधार म्हणून कुणाची निवड केली जाते, याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

KL Rahul: “त्याचा फॉर्म कधी येईल देवच जाणे…” केएल राहुलवरून भिडले भारताचे माजी दोन दिग्गज!

रोहित शर्मा घेणार निर्णय?

दरम्यान, उपकर्णधारपदी कुणाची वर्णी लागणार? याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यांमध्ये भारताचं उपकर्णधारपद कोण सांभाळणार, याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयनं रोहित शर्माला दिले आहेत.