शिरूरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या पुरुष विभागात मुंबई उपनगरने धुळे संघाचा ६६-१० असा एकतर्फी विजय मिळवित आपल्या गटात विजयी सलामी दिली. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे ४१-४ अशी भक्कम आघाडी होती. मुंबईच्या सय्यद आरिफ व सुदेश कुळे यांनी चांगला खेळ केला. धुळेकडून देवेंद्र साबळे यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. रायगड संघाने सांगली संघाचा १८-११ असा पराभव केला.
महिला विभागात पुणे संघाने सांगली संघाचा ५०-१६ असा धुव्वा उडवत विजयी सलामी नोंदवली. या स्पध्रेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते झाले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
कबड्डी : उपनगरकडून धुळ्याचा धुव्वा
शिरूरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या पुरुष विभागात मुंबई उपनगरने धुळे संघाचा ६६-१० असा एकतर्फी विजय मिळवित आपल्या गटात विजयी सलामी दिली. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे ४१-४ अशी भक्कम आघाडी होती.
First published on: 17-02-2014 at 02:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi dhule lost