भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आज ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. ६ जानेवारी १९५९ या दिवशी कपिल देव यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला. कपिल देव हे भारतीय क्रिकेटमध्ये मॅचविनर म्हणून ओळखले जातात. १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. कपिल देव हा असा खेळाडू आहे ज्याने लाखो लोकांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले.

सध्याच्या काळातही अनेक क्रिकेटपटूंना कपिल देवसारखे व्हायचे आहे. माजी भारतीय कर्णधाराने केवळ एकदिवसीयच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली. एकेकाळी तो जगातील सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज होता. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कपिल देव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण शेअर केली आहे. २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सचिन देखील एक भाग होता.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

सचिनने शेअर केली आठवण

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टरने त्याची आठवण शेअर केली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, “१० वर्षांच्या मुलाने १९८३ मध्ये कपिल देव यांना विश्वचषक जिंकताना पाहिले. त्यानंतर तो भारतासाठी दुसरा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहू लागला. तो मुलगा मी होतो. कपिल पाजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही लाखो लोकांना प्रेरणा देत रहा.”

वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला

१९८३च्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला होता. ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण. प्रथम खेळताना भारताने ५४.५ षटकांत सर्वबाद १८३ धावा केल्या. भारताने ही धावसंख्या उभारली तेव्हा विश्वचषक जिंकेल असे क्वचितच कुणाला वाटले असेल. त्या काळात वेस्ट इंडिजचा संघ अजिंक्य असायचा.

हेही वाचा: IND vs SL 2nd T20: पुणेकरांसमोर कोच राहुल द्रविडची मराठीतून ‘फटकेबाजी’; म्हणाला, “इथे बसणाऱ्यांना मराठी…”

त्यांनी सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. २५ जून १९८३ हा भारताचा दिवस होता. विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी कॅरेबियन संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ५२ षटकांत १४० धावा करून सर्वबाद झाला. अशाप्रकारे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विश्वचषक ४३ धावांनी जिंकण्यात यश मिळवले होते.

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियाच्या पराभवानंतरही संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे आनंदी? कारण ऐकून वाटेल आश्चर्य

कपिल देव यांनी सचिनमधील ही कमतरता सांगितली होती

कपिल देव यांनी एका ऑनलाइन लाइव्ह चॅटमध्ये म्हटले होते की, सचिन तेंडुलकरला शतकाला २०० आणि ३०० मध्ये कसे बदलायचे हे माहित नाही. यूट्यूबवरील ‘इनसाइड आऊट’ या शोमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांच्याशी झालेल्या संवादात कपिल देव म्हणाले की, मी सचिनसारखा टॅलेंट पाहिला नाही, पण तो निर्दयी फलंदाज नव्हता. भावना प्रदान फलंदाज मी पहिल्यांदाच पहिला. सचिन तेंडूलकरने देखील २०११ साली महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता.