Keshav Maharaj on Ram Siya Ram: दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज सध्या भारतात खूप लोकप्रिय क्रिकेटपटू बनत आहेत. यामागचे कारण म्हणजे त्याची मैदानावरील एन्ट्री. गेल्या काही काळापासून महाराज जेव्हा जेव्हा मैदानात येतात तेव्हा मैदानात ‘राम सिया राम’ भजन ऐकू येते. याबाबत बोलताना अखेर या आफ्रिकन गोलंदाजानेच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या वक्तव्याने भारतीय चाहत्यांचे मन जिंकले आहे. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घेऊ या.

पीटीआयशी बोलताना केशव महाराज म्हणाला, “मी स्वतःहा आज जाहीरपणे माध्यमांसमोर हे सांगत आहे की, असे काहीतरी गाणे आहे जे मी येताच वाजवाले जात आहे आणि ते पुढेही वाजवावे. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी दरम्यान त्यांना हे गाणे वाजवण्याची मी विनंती केली. माझ्यासाठी, देव खूप महत्वाचा असून त्याचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतो. तो नेहमी मला मार्गदर्शन करतो आणि वेगवेगळ्या स्वरूपात संधी देत असतो. त्याच्या आशीर्वादामुळेच हे मी करू शकतो. हे गाणे मला तुमच्या आठवणीत ठेवेल, मैदानात जाताना बॅकग्राऊंडला राम सिया राम गाणे ऐकू आल्याने माझा खेळ अजून चांगला होतो. हे गाणे ऐकल्याने मला खूप प्रसन्न वाटते.”

अलीकडेच भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जेव्हा केशव महाराज खालच्या क्रमाने फलंदाजीसाठी मैदानात यायचे तेव्हा हे भजन स्टेडियममध्ये ऐकू यायचे. दरम्यान, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलनेही मैदानावरच केशव महाराजला ही गोष्ट सांगितली होती. ज्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला होता. स्टंपच्या मागे उभा राहून राहुल फलंदाजी करणाऱ्या महाराजांना म्हणाला, “केशवभाई, तुम्ही फलंदाजीला आलात की हे गाणे सुरू होते.” केशव महाराजाने राहुलाही याबाबत यामागील कारण सांगितले होते. केशव महाराज अनेकवेळा या गाण्याबरोबर मैदानात प्रवेश करताना दिसला आहे.

केप टाऊन कसोटी सामना ६४२ चेंडूत संपला

केपटाऊनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना अवघ्या ६४२ चेंडूत संपला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी १-१ डाव पूर्ण केला होता. तर तिसऱ्या डावाची सुरुवातही पहिल्या दिवसासारखीच झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला गेला आणि भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले.

दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा मालिका अनिर्णित

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघाला यश आले. गेल्या वेळी २०१०-११मध्ये असे घडले होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. टीम इंडियाने पहिली कसोटी हरल्यानंतर दुसरी जिंकली आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता आफ्रिकेत मालिका अनिर्णित ठेवणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा: National Awards: मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार घेताना आईच्या डोळ्यात आले आनंद अश्रू; म्हणाला, “लोकांचे आयुष्य निघून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने हे लक्ष्य १२ षटकांत ७ गडी राखून पूर्ण केले. त्यानंतर हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना ठरला आहे. केप टाऊनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी भरपूर विकेट्स घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनीही आपापल्या ५ विकेट्स पूर्ण केल्या.