भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन टी-२० मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात दवाचा खूप परिणाम झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात उतरताच पोलार्डने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. हा त्याचा १००वा टी-२० सामना आहे. वेस्ट इंडीजकडून १०० टी-२० सामना खेळणारा तो पहिला खेळाडू आहे.

या विक्रमासाठी पोलार्डला विंडीज संघाकडून खास जर्सी आणि कॅप देण्यात आली. या जर्सीच्या मागील बाजूस १०० आकडा लिहिला होता. पोलार्डने या सामन्यापर्यंत ९९ टी-२० सामन्यांमध्ये १५६१ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने टी-२० मध्ये ४२ विकेट्स घेतल्या आहेत. १०० टी-२० सामने खेळणारा तो जगातील नववा खेळाडू आहे.

हेही वाचा – विराट कोहली प्रमुख मालिकेला मुकणार; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार पुनरागमन!

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने सर्वाधिक १२४ टी-२० सामने खेळले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यापर्यंत त्याने १२० टी-२० सामने खेळले आहेत. विराट कोहलीचा हा ९७वा टी-२० सामना आहे.