भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर टी-२० मालिका सुरू झाली आहे. टी-२० मालिकेचा भाग असलेले खेळाडू ऑस्ट्रेलियात थांबले असून इतर वरिष्ठ खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यापैकी एक आहे केएल राहुल. केएल राहुलने नुकत्याच एका पोडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने पीटरसनच्या पत्नीला त्याची तक्रार केली होती, तो किस्सा सांगितला.
केएल राहुल आणि केविन पीटरसन अनेकदा मैदानावर एकमेकांची फिरकी घेताना दिसतात. केविन पीटरसन सध्या समालोचन करतो आणि राहुल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. दरम्यान, केएल राहुल २०२५ च्या आयपीएल हंगामात दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला. तर पीटरसनही दिल्लीच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. ड्रेसिंग रूममध्ये दोघं एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात आणि ट्रोलही करतात.
आयपीएल २०२५ मध्ये केएल राहुलने दिल्लीसाठी काही उत्कृष्ट खेळी केल्या, यासाठी पीटरसनने त्याचं कौतुक केलं. पीटरसनने एकदा आयपीएल केएल राहुलच्या वक्तव्याने बराच वाद निर्माण झाला होता. पीटरसनने या पोस्टमध्ये लिहिले होते की, पॉवरप्लेमध्ये केएल राहुलला फलंदाजी करताना पाहणं सर्वात कंटाळवाणं आहे.
केएल राहुलने यानंतर पीटरसनलाही ट्रोल केलं आणि विचारलं की लीग स्टेज सामन्यादरम्यान कोणीही मालदीवला सुट्टीवर कसं जाऊ शकतं. टू स्लॉगर्स पोडकास्टमध्ये बोलताना बोलताना केएल राहुलने सांगितलं की त्याची पत्नी अथिया शेट्टीने एकदा त्याला असंही म्हटलं होतं की तू पीटरसनशी असा का वागतोस.
राहुल पोडकास्टमध्ये म्हणाला, “दिल्लीकडून मी खेळताना पीटरसनच्या वाक्यावर १-२ वेळेस उत्तरं दिली होती. दिल्लीने ते व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ते व्हीडिओ पाहून मला माझ्या बायकोने म्हटलं, तू त्याच्याशी असं का वागतोस, तो एक चांगला व्यक्ती आहे.”
यावर राहुल आथियाला म्हणाला होता, “तो जेवढं माझ्याबरोबर वागतो आणि मला बोलतो, त्याच्या निम्म्या गोष्टीही कधी समोर येत नाही. तो मला १०० गोष्टी बोलला आहे आणि त्यापैकी मी फक्त ३ वेळा त्याला उत्तर दिलंय ज्याचे व्हीडिओ पोस्ट झालेत.”
इंग्लंडला एकदा ट्रीपसाठी गेले असताना राहुल पीटरसनच्या घरी डिनरला गेला होता. तेव्हा त्याने पीटरसनची तक्रार त्याच्या पत्नीकडे गेली होती. याबाबत सांगताना राहुल म्हणाला, “आम्ही जेव्हा युकेला गेलो होतो, तेव्हा मी त्याच्या पत्नीकडे त्याची तक्रार केली. त्यांनी मला डिनरसाठी बोलावलं होतं आणि तेव्हा मी तिला सांगितलं. तुझ्या नवऱ्याला सांग की मला त्रास देऊ नकोस, तो माझ्याशी खूप उद्धटपणे वागतो.” राहुलने या वर्षी इंग्लंडमधील कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी केली, त्याने १० डावांमध्ये ५३२ धावा केल्या, ज्यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.
