KL Rahul On Last Over Drama: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला लॉर्ड्स कसोटीतील तिसरा दिवस चांगलाच चर्चेत राहिला. तिसऱ्या दिवशी खूप काही घडलं, पण शेवटच्या षटकात जे काही झालं ते चर्चेचा विषय ठरलं. भारतीय संघाचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडला २ षटक खेळण्यासाठी मैदानात यावं लागलं. तिसरा दिवस संपायला जितका वेळ शिल्लक होता, त्या वेळेत २ षटकं टाकली जाणार होती. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी वेळ वाया घालवला. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना केवळ १ षटक टाकता आलं. हे भारतीय खेळाडूंना मुळीच आवडलं नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू आणि इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये बाचाबाची झाली. शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं, याबाबत केएल राहुलने मोठा खुलासा केला आहे.
भारतीय गोलंदाज २ ते ३ षटकं टाकण्याच्या तयारीत होते. पण जॅक क्रॉलीने वेळ वाया घालवण्यावर अधिक भर दिला. हे कर्णधार शुबमन गिलला मुळीच आवडलं नाही. गिलचा पारा चढला आणि तो जॅक क्रॉलीकडे गेला आणि त्याला काहीतरी म्हणाला. पहिल्या षटकातील पाचवा चेंडू हा क्रॉलीच्या ग्लोव्ह्जला जाऊन लागला. त्यामुळे त्याने फिजिओला मैदानात बोलवलं आणि वेळ वाया घालवला. हे पाहून भारतीय खेळाडू टाळ्या वाजवताना दिसून आले. ज्यात कर्णधार शुबमन गिल सर्वात पुढे होता.
काय म्हणाला केएल राहुल?
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर केएल राहुल म्हणाला, ” इंग्लंडच्या सलामीवीरांनी शेवटी थोडं नाटक केलं. आम्ही जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलो तेव्हा सर्व उत्साहित होते. इंग्लंडच्या खेळाडूंनी पूर्ण दिवस क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे शेवटचे २ षटक खेळण्यासाठी फलंदाजीला येणं हे खूप कठीण असतं, हे आम्हाला चांगलच माहिती आहे. त्यामुळे कमीत कमी एक विकेट घेण्याचा आमचा प्रयत्न होता. हे आमच्यासाठी परफेक्ट ठरलं असतं.”
नेमंक काय घडलं?
तर झाले असे की, भारतीय संघाचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. इंग्लंडचाही पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला होता. शेवटी भारतीय फलंदाजांनी झटपट धावा गोळा करण्याच्या नादात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात भारतीय संघाचा डाव आटोपला. त्यामुळे इंग्लंडला शेवटचे २ षटक खेळण्यासाठी फलंदाजीला यावं लागलं. पण, इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ १ षटक खेळायचं होतं. दुसरं षटक टाकलं जाऊ नये, म्हणून हॅरी ब्रुकने वेळ वाया घालवायला सुरूवात केली. आधी त्याने साईट स्क्रिनचं कारण देत वेळ वाया घालवला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने ग्लोव्ह्जला चेंडू लागल्याचं कारण देऊन फिजिओला मैदानात बोलवलं. त्यामुळे पंचांनी १ षटक झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्याची घोषणा केली. जॅक क्रॉलीने वेळ वाया घालवणं हे भारतीय खेळाडूंना मुळीच आवडलं नाही. याचे परिणाम सामन्यातील चौथ्या दिवशी दिसू शकतात.