Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच कालावधी उरला आहे. आशिया चषकचा महासंग्राम 30 ऑगस्टला सुरु होणार आहे. या टूर्नामेंटमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. परंतु, नुकतच बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आणि पाठोपाठ अन्य चार देशांनीही त्यांचे संघ जाहीर केले. पाकिस्तानसह अन्य तीन देशांनी त्यांच्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी दिलीय आणि आशिया चषकाचे रंगतदार सामने कुठे आणि कधी खेळवले जाणार आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हायब्रिड मॉडेलनुसार खेळवला जाणार आशिया चषक
आशिया चषक 2023 चा पहिला सामना मुल्तान येथे खेळवला जाणार आहे. यानंतर 3 सप्टेंबरला बांग्लादेश आणि अफगानिस्तान यांच्यात लाहोर येथे सामना रंगणार आहे. लाहोरमध्ये 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला हे सामने खेळवण्यात येणार आहेत. याशिवाय इतर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. टूर्नामेंटच्या फायनलचा महामुकाबला 17 सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे.
2 सप्टेंबरला होणार भारत पाकिस्तान सामना
2023 आशिया चषकाचा भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला 2 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. मागील सामन्यांप्रमाणे यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने रंगणार आहेत. जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले, तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना तीनवेळा पाहायला मिळेल.
आशिया चषक 2023 साठी भारताची 17 सदस्यीय टीम : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (रिझर्व विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
2023 आशिया चषकासाठी बांग्लादेशचा संघ : शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शान्तो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मम्हूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन , शोरफुल इस्लाम, एबादोत हुसैन आणि मोहम्मद नईम.
2023 आशिया चषकासाठी नेपालचा संघ : रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शर्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतीश जीसी, मौसम ढकाल, संदीप जोरा , किशोर महतो आणि अर्जुन साउद.