दिग्गज गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीताच्या एका युगाचा अंत झाला असून त्यांचा प्रत्येक चाहता आज दु:खात आहे. आहे. लतादीदींच्या निधनाचा शोक केवळ भारतातच नाही, पाकिस्तानातही आहे. पाकिस्तानातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू लता मंगेशकर यांचे चाहते होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लतादीदींच्या निधनाबद्दल पाकिस्तानातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद हाफीज, वकार युनूस, पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ट्वीट करून लिहिले, ‘सुवर्ण युगाचा शेवट. लताजींचा जादुई आवाज, त्यांचा वारसा लाखो लोकांच्या हृदयात जिवंत राहील. एक अनोख्या आयकॉन.” पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद हाफीजने लता मंगेशकर यांचा फोटो ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – IND vs WI 1st ODI : …म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी दंडावर बांधली काळी पट्टी!

पीसीबी प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमीझ राजा म्हणाले, ”लता मंगेशकर कृपा, नम्रता आणि साधेपणाचे प्रतीक होत्या आणि म्हणूनच त्या महान होत्या. आपल्या सर्वांसाठी हा एक धडा आहे. किशोर कुमार आणि आता लता मंगेशकर यांच्या निधनानंतर माझे संगीत संपले आहे.”

वकार युनूसनेही ट्वीट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वकार युनूसने लिहिले, ”लता मंगेशकर यांच्या निधनाने खूप दुःख झाले. दुसरी लता मंगेशकर कधीच होणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar passes away pakistan cricketers pays tribute adn
First published on: 06-02-2022 at 17:17 IST