सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत पाचव्या मानांकित लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपानेक जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. व्हॅसेक पॉसपिसिल आणि जॅक सॉक जोडीने दुसऱ्या फेरीत पेस-स्टेपानेक जोडीवर ६-१, ४-६, १०-८ असा विजय मिळवला. या जोडीनेच भारताच्या रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशी जोडीलाही नमवले होते. सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅक जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हान जिवंत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2014 रोजी प्रकाशित
पेस-स्टेपानेकचे आव्हान संपुष्टात
सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत पाचव्या मानांकित लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपानेक जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
First published on: 15-08-2014 at 05:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leander paes and radek stepanek crash out in cincinnati