हॅमिल्टनला पोल पोझिशन

मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन मिळवली.

मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या पात्रता फेरीत १ मिनिट १५.०९८ सेंकदांची वेळ नोंदवून रविवारी होणाऱ्या मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत पोल पोझिशन मिळवली. दोन वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या हॅमिल्टनने संघ सहकारी निको रोसबर्गला ०.३४२ सेकंदांच्या फरकाने पिछाडीवर टाकले. रोसबर्ग मुख्य शर्यतीत दुसऱ्या, तर फेरारीचा सेबेस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावरून सुरुवात करणार आहेत.
‘‘येथे पोल पोझिशन मिळवण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. किती आनंद झाला, हे शब्दात सांगणे कठीण आहे,’’ अशी प्रतिक्रिया हॅमिल्टनने पात्रता फेरीनंतर दिली. यंदाच्या सत्रात पाचपैकी तीन शर्यतींत बाजी मारणाऱ्या हॅमिल्टनसमोर रविवारी रोसबर्ग आणि वेटेल यांचे कडवे आव्हान असणार आहे. ‘‘मुख्य शर्यतीत आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. तसे झाल्यास मर्सिडीजच्या शर्यतपटूंना नमवणे सहज शक्य होईल,’’ असे मत वेटेलने व्यक्त केले.
रेड बुल रेसिंग रेनॉल्टच्या डॅनिएल रिकीआडरे आणि डॅनील क्वीट हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या, तर फोर्स इंडियाच्या सेर्गिओ पेरेज सातव्या स्थानावरून सुरुवात करणार  आहे. त्यामुळे फोर्स इंडिया संघाला गुण मिळवण्याची संधी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lewis hamilton takes his first monaco gp pole position

ताज्या बातम्या