वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत असून स्टीपलचेस आणि लांब उडी या खेळ प्रकारामध्ये दोन खेळाडू अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरने आठ मीटर उडी मारून हे यश मिळवले तर स्टिपलचेसमध्ये अविनाश साबळेने पात्रता फेरीमध्ये सातवे स्थान मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

हेही वाचा >> विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांना शोएब अख्तरने सुनावले; म्हणाला, “तुम्ही फक्त…”

ओरेगॉनमधील यूजीन येथे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पात्रता फेरीमध्ये त्याने आठ मिटरची लांब उडी मारुन सातवे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. लांब उडी या खेळ प्रकारामध्ये भारताचे जेस्वीन अल्ड्रीन आणि मोहम्मद अनीस याहिया असे आणखी दोन खेळाडू होते. मात्र जेस्वीन ७.७९ मीटरपर्यंत लांब उडी मारु शकला. तर मोहम्मदने आपल्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये ७.७३ मीटर लांब उडी मारली. या दोन्ही खेळाडूंचा गुणतालिकेत टॉप १२ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे ते अंतिम सामन्यात प्रवेश करु शकले नाहीत.

हेही वाचा >> ‘बीसीसीआय’च्या घटनादुरुस्ती याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी?

तर दुसरीकडे स्टिपलचेस प्रकारामध्ये अविनाश साबळेनेही चांगली कामगिरी केली. त्याने आठ मिनिटे १८.७५ सेकंदांमध्ये अंतर पूर्ण करत पात्रता फेरीत तिसरे स्थान गाठले. या कामगिरीमुळे तो ३००० हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम सामन्यास पात्र ठरला. स्टीपलचेस आणि लांब उडी स्पर्धेची अंतिम फेरी येत्या सोमवारी (भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी ६.५० वाजता) यूजीन येथे होणार आहे.