सबज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
मध्य प्रदेश संघाने हॉकी इंडिया सबज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष तसेच महिला गटात जेतेपदावर नाव कोरले. महिला गटाच्या अंतिम फेरीत, मध्य प्रदेश हॉकी अकादमी संघाने महाराष्ट्राचा ७-० असा धुव्वा उडवला. कर्णधार करिशम यादवने सर्वाधिक तीन गुणांची कमाई केली. राखी प्रजापतीने २ तर नीलू दाडिया आणि उपासना सिंग यांनी प्रत्येकी १ गोल केला. पुरुषांच्या गटात मध्य प्रदेशने महाराष्ट्रावर ८-३ असा विजय मिळवला. पहिल्या सत्रात मध्य प्रदेशने ४-० अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने झुंजार खेळ करत ३ गोल केले.