सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडिअमवर रणजी क्रिकेट सामन्यात तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्र संघाने मणिपूरवर सकाळच्या सत्रात मणिपूर संघावर एक डाव आणि ६९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राचा अंकित बावणे सामनावीर ठरला.

मणिपूर संघाकडून कालच्या ४ बाद ८५ धावांवरून वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात केली. परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही . सिद्धेश वीर याने दिवसाचा पहिला झटका दिला .किशन संघा १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर एका पाठोपाठ सर्व फलंदाज तंबूत परतत गेले. मणिपूरला ५५.२ षटकांत सर्वबाद ११४ मजल गाठता आली. मणिपूरकडून सर्वाधिक नीतेश २६ धावा, तर जॉन्सन याने २५ धावांचे योगदान देऊ शकले.

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य

महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने ५.२ षटक टाकत अवघ्या १० धावा देत मणिपूरचे ४ गडी बाद केले. त्याला हितेश वाळुंज याने ३१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा : डेव्हिड वॉर्नर- सळसळत्या ऊर्जेचा आणि निष्ठेचा कर्मयोगी

सोलापुरात तब्बल २९ वर्षांनी रणजी क्रिकेट सामना पार पडला. सोलापूर क्रिकृट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, चेअरमन माजी आमदार दिलीप माने, धैर्यशील मोहिते-पाटील, चंद्रकांत रेम्बर्सु आदींनी या सामन्यासाठी केलेल्या नेटक्या नियोजनाबद्दल महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव याने समाधन व्यक्त केले. मात्र या सामन्यासाठी प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.