बिश्केक  : अनेक अडथळयांची आव्हाने पार करून ऑलिम्पिक कोटा मिळविल्याचा विनेश फोगट निश्चित आनंदी असेल, पण आता आराम करून चालणार नाही. ऑलिम्पिकपर्यंत पुढील चार महिने मला वजन राखण्याची कसरत करावी लागेल, असे मत विनेशने व्यक्त केले.

विनेशने वैयक्तिक आयुष्यातील संकटांवर मात देत सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक कोटा मिळवला. कुस्ती महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकल्यानंतर जवळपास दीड वर्षे ती मॅट सरावापासूनही दूर राहिली होती. अशात तिच्या नेहमीच्या ५३ किलो वजनी गटातून अंतिम पंघालने ऑलिम्पिक कोटा मिळवला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळण्याच्या उद्देशाने पेटून उठललेल्या विनेशने वजनी गट बदलून ५० किलोमधून खेळण्याचा निर्णय घेतला. यातही पहिला अडथळा पार करताना विनेशने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. विनेश म्हणाली,‘‘ हे सारे अद्भुत आहे. मी कमालीची आनंदी आणि अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित झाली आहे. कठोर मेहनत घेऊन मी वजन ५० किलोपर्यंत खाली आणले आहे. आता पुढील चार महिने ते टिकवून ठेवण्याचे मुख्य आव्हान मला पेलावे लागणार आहे.’’

How to get rid of mosquitoes tips
बीअरच्या वासाने घरातील डास होतील नाहीसे? डासांना घालविण्याचे पाहा ‘आठ’ हटके उपाय…
road contractors effort to fill natural pond at kopar in dombivli
डोंबिवलीत कोपर येथे नैसर्गिक तलाव रस्त्यासाठी बुजविण्याच्या हालचाली, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी
Why Should you soak rice before cooking Does it help reduce blood sugar
भात करण्याआधी तांदूळ भिजवण्याचे फायदे वाचून व्हाल खुश; डॉक्टर सांगतायत, तांदूळ किती वेळ पाण्यात ठेवावा?
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Ghatkopar accident, VJTI, cause,
घाटकोपर दुर्घटना : कारणमीमांसा करण्यासाठी व्हीजेटीआयची मदत घेणार
Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
s jaishankar claim stock market to become less volatile after every election phase print
देश पुन्हा १९९२ पूर्वीच्या अराजकतेत गेल्याचे गुंतवणूकदारांना नकोच; एस. जयशंकर, बाजार अस्थिरता मतदानाच्या पुढील टप्प्यात संपुष्टात येण्याचा दावा 
Womens Health Marina alternative to hysterectomy
स्त्री आरोग्य : गर्भाशय काढून टाकण्याला ‘मेरीना’चा पर्याय?

हेही वाचा >>> PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय, राहुल तेवतिया-साई किशोरचे शानदार प्रदर्शन

‘‘माझ्या शरीरातील पेशी झपाटयाने वाढतात. मी तंदुरुस्त दिसत असले, तरी माझ्याकडे पिळदार स्नायू असल्यामुळे वजन पटकन वाढते. मॅटवरील सरावाची मला चिंता नाही. माझ्याकडे फक्त चार महिने आहेत आणि काही करून मला वजन नियंत्रित करायचे आहे,’’ असेही विनेशने जागतिक कुस्ती महासंघाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘‘ऑलिम्पिक संघ निवडताना आता भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. मी देशासाठी ५० किलो वजनी गटात कोटा मिळविल्याचा मला आनंद आहे. आता मी ५० किलो की ५३ किलो वजनी गटातून ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे संघ निवड चाचणीतून निश्चित होईल,’’ असेही विनेश म्हणाली.