MCC clarified on Mitchell Starc’s controversial catch of Ben Duckett: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळली गेली. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सच्या वादळी शतकानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियाला ४३ धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात मिचेल स्टार्कच्या झेलपासून जॉनी बेअरस्टोच्या विकेटपर्यंत बरेच वादा पाहिला मिळाले, परंतु यापैकी मिचेल स्टार्कच्या झेलवर एमसीसीने स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावात ११४ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी २५७ धावांची गरज होती. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कने बेन डकेटचा झेल घेतला. मात्र, तिसऱ्या पंचाने बेन डकेटला नाबाद घोषित केले आले. त्यानंतर ऑस्ट्रलियाच्या कर्णधारासह संघातील इतर खेळाडूंनी अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. यावर आता मेरिलेबोन क्रिकेट क्लबने स्टार्कचा झेल वैध का नाही हे स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेटने सलामीला आला होता. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने नाबाद ५० धावा केल्या होत्या. दरम्यान बेन डकेटने कॅमेरून ग्रीनच्या एका षटकात एक शॉट खेळला, यानंतर स्टार्कने त्याचा झेल पकडला. पण त्याने झेल घेतल्यानंतर चेंडूचा जमिनीला स्पर्श झालेला दिसला. त्यामुळे मैदानावरील अपायंरनने हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला . त्यानंतर थर्ड अंपायरने डकेटला नाबाद घोषित केले. ज्यावर मेरीलेबोन क्रिकेट क्लबने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Ashes Series 2023: जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त विकेटवर बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्सने दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने ट्विट करून नियम सांगितला. क्लबने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नियमानुसार झेल घेताना क्षेत्ररक्षकाचे चेंडूवर आणि स्वतःचे पूर्ण नियंत्रण असले पाहिजे, तरच तो झेल योग्य मानला जाईल. या दरम्यान चेंडू जमिनीला स्पर्श करू नये. मिचेल स्टार्कच्या बाबतीत, तो घसरत आहे आणि चेंडू जमिनीवर घासताना दिसत आहे. झेल पकडण्यावर त्याचे नियंत्रण नव्हते.”

एमसीसीचा नियम काय सांगतो?

या प्रकरणावर, एमसीसीच्या क्रिकेटच्या नियमात समावेश असलेला नियम ३३.३ सांगतो की, “जेव्हा चेंडू प्रथम क्षेत्ररक्षकाच्या संपर्कात येतो तेव्हा झेल घेण्याची क्रिया सुरू होते. आणि जेव्हा क्षेत्ररक्षक चेंडू आणि त्याची हालचाल या दोन्हींवर पूर्ण नियंत्रण मिळवतो तेव्हा ते संपते.”

हेही वाचा – Australia vs England: बेन स्टोक्सने षटकारांच्या हॅट्ट्रिकसह झळकावले वादळी शतक, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या जोरावरऑस्ट्रेलियाला ९१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या आणि इंग्लडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले, परंतु प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcc clarified on mitchell starcs controversial catch of ben duckett in ashes series 2023 vbm
First published on: 03-07-2023 at 11:01 IST