नवी दिल्ली : ‘फिफा’ कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली असून, भारताला ‘अ’ गटात अमेरिका, ब्राझील आणि मोरोक्कोचे कडवे आव्हान असणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबई या तीन शहरांत होणार आहे. एकूण १६ संघांची विभागणी ही चार गटांत करण्यात आली आहे.

भारताची ११ ऑक्टोबरला (मंगळवारी) पहिल्या लढतीत अमेरिकेशी गाठ पडणार आहे. भारताचा दुसरा सामना १४ ऑक्टोबरला (शुक्रवारी) मोरोक्को तर, १७ ऑक्टोबरला (सोमवारी) ब्राझीलशी होणार आहे.

 संघांची गटवारी : गट-अ : भारत, अमेरिका, मोरोक्को, ब्राझील; गट-ब : जर्मनी, नायजेरिया, चिली, न्यूझीलंड;गट-क : स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन

गट-ड : जपान, टांझानिया, कॅनडा, फ्रान्स