Glenn Maxwell Equals Rohit Sharma Record: अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने षटकारांचा पाऊस पाडता ४८ चेंडूत दमदार शतक झळकावलं आहे. या शतकी खेळीसह मॅक्सवेलने रोहित शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ८ शतकं झळकावण्याची नोंद आहे. हे शतक पूर्ण करताच त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

वॉशिंग्टन फ्रिडम संघाकडून फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अवघ्या ४९ चेंडूत १०६ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १३ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या ५ गडी बाद २०८ धावांपर्यंत पोहोचवली. ग्लेन मॅक्सवेलसह मिचेन ओवेनने सलामीला फलंदाजी करताना ३२ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला लॉस एंजिलिस नाईट रायडर्सचा डाव अवघ्या ९५ धावांवर आटोपला.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

ख्रिस गेल- २२( ४५५ डावात)
बाबर आझम- ११ ( ३०९ डावात)
रिले रुसो – ९ (३६३ डावात)
विराट कोहली- ९ (३९७ डावात)
मायकल क्लिंगर- ८ (१९८ डावात)
आरोन फिंच -८ (३८० डावात)
डेव्हिड वॉर्नर- ८ (४११ डावात)
जोस बटलर -८ ( ४३५ डावात)
ग्लेन मॅक्सवेल- ८* (४४० डावात)
रोहित शर्मा- ८ (४५० डावात)

या सामन्यात फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलने सुरूवातीच्या १५ चेंडूत अवघ्या ११ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील ३४ चेंडूत त्याने ९५ धावा केल्या. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. लॉस एंजिलिस नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावा करायच्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना लॉस एंजिलिस नाईट रायडर्स संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९५ धावांवर आटोपला. फलंदाजीत ग्लेन मॅक्सवेल चमकल्यानंतर गोलंदाजीत डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर चमकला. त्याने गोलंदाजीत ३.३ षटक गोलंदाजी करत अवघ्या ६ धावा खर्च करत २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने १ निर्धाव षटक टाकलं. हा सामना वॉशिंग्टन फ्रिडम संघाने ११३ धावांनी आपल्या नावावर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.