scorecardresearch

Premium

MLC Final 2023: निकोलस पूरनचे वादळी शतक! अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले जेतेपद

MLC 2023: मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, कर्णधार निकोलस पूरनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर एमआय न्यूयॉर्क संघाने अंतिम फेरीत सिएटल ऑर्कास संघाचा ७ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सची ही नववी ट्रॉफी आहे.

Nicholas Pooran's excellent Century in the final of Major League Cricket Mumbai New York won the title by seven wickets
मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले जेतेपद सौजन्य- (ट्वीटर)

MI New-York won MLC 2023: अमेरिकेत सुरु असलेल्या मेजर लीग क्रिकेटच्या (एमएलसी) पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या संघाने अंतिम सामन्यात सिएटल ऑर्कास संघाचा ७ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरनने ५५ चेंडूत नाबाद १३७ धावांची तुफानी शतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. एमआय न्यूयॉर्क संघाने हे लक्ष्य अवघ्या १६ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नऊ ट्रॉफी जमा झाल्या आहेत.

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या संघाने जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात शून्य धावसंख्येवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार निकोलस पूरनने येताच आपले इरादे स्पष्ट केले. एका टोकाकडून सातत्याने आक्रमक धावा करणाऱ्या निकोलस पूरनने ६ षटकांत संघाची धावसंख्या ८० धावांपर्यंत नेली.

west indies decline
World Cup Cricket: वेस्ट इंडिजच्या गतवैभवाच्या राहिल्या फक्त आठवणी…
World Cup 2023: Will Virat Kohli retire from ODI and T20 after the World Cup Big claim from a close friend AB de Villiers
AB de Villiers: वर्ल्डकपनंतर विराट कोहली वन डे आणि टी२० मधून निवृत्ती घेणार? एबी डिव्हिलियर्सने केला मोठा दावा
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम
IND vs AUS 1st ODI: Team India becomes No.1 in ICC ranking after beat Australia by five wickets Shubman-Rituraj excellent batting
IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले

निकोलस पूरनने सिएटल ऑर्कासच्या गोलंदाजांवर एका टोकाकडून आक्रमण सुरूच ठेवले. पूरनने डेवाल्ड ब्रेविससोबत तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ७५ धावांची भागीदारी केली. एमआय न्यूयॉर्कला या सामन्यात तिसरा धक्का १३७ धावांवर ब्रेविसच्या रूपाने बसला, जो २० धावा करून धावबाद झाला. यानंतर निकोलस पूरनने आपले शतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. पूरनच्या बॅटने ५५ चेंडूत १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने नाबाद १३७ धावांची खेळी साकारली.

क्विंटन डिकॉकचे धडाकेबाज खेळी व्यर्थ

सिएटल संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डिकॉकने ५२ चेंडूत ८७ धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, त्यावर निकोलस पूरनच्या शतकी खेळीने पाणी फिरवले. यादरम्यान डिकॉकने ४ षटकार आणि ९ चौकार लगावले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. न्यूयॉर्क संघाकडून ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतले.

निकोलस पूरनने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क विजय मिळवून दिला

पूरनने नाबाद शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पूरनने या सामन्यात ५५ चेंडूत १३७ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने १३ षटकार आणि १० चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही २४९ होता. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूयॉर्क संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने खाते न उघडता स्टीव्हन टेलरच्या रूपाने पहिली विकेट गमावली होती. यानंतर कर्णधार आणि यष्टिरक्षक निकोलस पूरनने तिसऱ्या क्रमांकावर येऊन आघाडी घेतली. त्याने सिएटल संघाच्या गोलंदाजांना चौफेर फटकेबाजी करत अक्षरशः धुतले.

हेही वाचा: Team India: “धवन सलामीला अन रोहित, विराट ‘या’ क्रमांकावर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिला अजब पर्याय

मुंबई इंडियन्सची ही नववी ट्रॉफी आहे

चॅम्पियन्स लीग २०११
आयपीएल २०१३
चॅम्पियन्स लीग २०१३
आयपीएल २०१५
आयपीएल २०१७
आयपीएल २०१९
आयपीएल २०२०
डब्ल्यूपीएल २०२३
मेजर लीग क्रिकेट २०२३

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mlc final 2023 mi new york won the mlc title with nicholas poorans century beat seattle orcas in the final avw

First published on: 31-07-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×