भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराज आणि इशान किशनला संधी मिळू शकते. त्यामुळे या दोन युवा खेळाडूंनी आपली तयारी सुरु केली असून त्यांचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वास्तविक, सिराज आणि किशनने इंदोर कसोटीपूर्वी स्टायलिश हेअरकट केले आहे. या दोन्ही खेळाडूंनी स्टायलिश हेअरकटचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. जे चाहत्यांना देखील तो खूपच आवडत आहेत.

मोहम्मद सिराजने स्किन-फेडेड साइड्ससह स्टायलिश अंडरकट हेअरस्टाइल केली आहे. दुसरीकडे, इशान किशनबद्दल बोलायचे तर, त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीप्रमाणे त्याची केशरचना केली आहे. किशनने बाजूंनी रेझर केलेले हेअरकट केले आहे. त्यामुळे चाहते त्याच्या स्टाईलची तुलना माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या हेअरस्टाइलशी करत आहेत. या दोन्ही क्रिकेटर्सचे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, दोन्ही कसोटी सामने खेळण्याची संधी सिराजला मिळाली. यादरम्यान त्याने एक विकेट आपल्या नावावर केली आहे. मात्र, दोन्ही कसोटीत फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यानंतर सिराजला फारशी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याचवेळी इशान किशनला सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. याशिवाय टीम इंडिया कसोटी क्रमवारीतही पहिल्या स्थानावर आली असून आता भारत आयसीसी क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही संघाला खूप फायदा झाला आहे. जर संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटी जिंकण्यातही यशस्वी ठरला तर भारत WTC च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.