Mohammad Siraj credited Jasprit Bumrah for his brilliant bowling : केपटाऊन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. या कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ६ विरोधी फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ६ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, या कसोटी सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज सांगत आहे की, जसप्रीत बुमराहने त्याला शानदार गोलंदाजी करण्यास कशी मदत केली.

काय म्हणाला सामनावीर मोहम्मद सिराज?

या व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज म्हणत आहे की, जसप्रीत बुमराहने त्याला चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करण्यास मदत केली. जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजला सांगितले की, त्याला फक्त चांगल्या लाइन आणि लेन्थवर गोलंदाजी करायची आहे, जास्त काही करण्याची गरज नाही. तसेच मोहम्मद सिराज म्हणाला की, ‘शेवटच्या कसोटीत आम्ही चांगल्या लाइन आणि लेन्थवर गोलंदाजी करू शकलो नाही, त्यामुळे विरोधी फलंदाजांनी सहज धावा केल्या, पण आम्ही आमच्या मागील चुकांमधून शिकलो. त्यामुळे केपटाऊन कसोटीत चांगली गोलंदाजी करू शकलो.’

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘सिराज त्याच्या लाइन आणि लेन्थमुळे सतत संघर्ष करत होता…’

त्याचवेळी जसप्रीत बुमराहने सांगितले की, ‘पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराज त्याच्या लाइन आणि लेन्थमुळे सतत संघर्ष करत होता. त्यानंतर मी म्हणालो की, चांगल्या लाइनवर सतत गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्यानंतर सिराजने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज व्हिडीओमध्ये पुढे म्हणाला की, ‘जस्सी भाई मला सामन्याच्या सुरुवातीला सांगतो की कोणत्या लाइन आणि लेन्थने गोलंदाजी करावी, याचा मला खूप फायदा होतो.’ मोहम्मद सिराजला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. तर जसप्रीत बुमराह आणि डीन एल्गर यांची ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा – AUS vs PAK 3rd Test : जमालने गोलंदाजी करताना लाबुशेनची अशी फिरकी घेतली की क्षणभर सर्वच झाले अवाक्, पाहा VIDEO

बुमराहने शमी, श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसादचा विक्रम मोडला –

जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. पाच विकेट्स घेताच त्याने जवागल श्रीनाथची बरोबरी केली. श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये तीनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.

हेही वाचा – IND vs SA : ‘तुम्ही केला तर चमत्कार, आम्ही केले तर खेळपट्टी बेकार…’, दुसऱ्या कसोटीनंतर वीरेंद्र सेहवागची सडकून टीका

मोहम्मद सिराजने पहिल्या डावात घेतल्या सहा विकेट्स –

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Story img Loader