अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी -२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. तो केवळ टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसोबत खूप जवळून काम करत नाही तर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत रणनीती तयार करण्यात मदत करत आहे. तसेच तो अनेक खेळाडूंची शाळा देखील घेत आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यापूर्वी काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात धोनी बॉण्ड्री लाइनजवळ ऋषभ पंतला विकेट किपिंग समजावताना आणि त्याच्यासोबत सराव करताना दिसत आहे, त्यानंतर एका फोटोत तो विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत दिसत आहे. 

टी -२० विश्वचषकाच्या सुपर -१२ फेज सुरू होण्यापूर्वी पात्रता आणि सराव सामने खेळले जात आहेत. भारताने त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला, तर दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया त्यांच्यासमोर आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा या सराव सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळत आहे. 

धोनीने वर्ल्डकपसाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतलेले नाही. भारताने २००७ मध्ये फक्त टी-२० विश्वचषक जिंकला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी

भारताचे टी-२० विश्वचषकातील सामने

  • २४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • ३१ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • ३ नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
  • ५ नोव्हेंबर: भारत विरुद्ध B1
  • ८ नोव्हेंबर: भारत विरुद्ध A2