MS Dhoni IND vs NZ:रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी जीवदान दिले आहे. माहितीसाठी सांगतो की हा सामना रांचीमध्ये होत आहे. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीही सामना पाहण्यासाठी पोहोचला. त्याच्यासोबत त्याची पत्नी साक्षीही दिसली. धोनीच्या पॅव्हेलियनचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रांची हे एमएस धोनीचे होम टाऊन आहे. त्याच्या जागेवरच सामना व्हावा आणि तो सामना बघायला येऊ नये, हे खूप आयुष्यात कधीच घडलं नसत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी एमएस धोनी पोहोचला

टी२० आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी दोन खास प्रेक्षक पोहोचले. ते दुसरे कोणी नसून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी होते. यादरम्यान जेव्हा-जेव्हा कॅमेरा त्याच्याकडे जायचा तेव्हा प्रेक्षक धोनी-धोनी ओरडताना दिसत होते. अनेक दिवसांपासून राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेला धोनी आणि त्याची पत्नी साक्षी संघासोबत उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. यादरम्यानचे फोटो व्हायरल होत आहेत.

हेही वाचा:I ND vs NZ 1st T20: व्वा काय जबरदस्त झेल! वॉशिंग्टन सुंदरचा सूर मारत अप्रतिम झेल; ब्लॅक कॅप्स झाला आश्चर्यचकित, Video व्हायरल

धोनी आणि साक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी धोनी ट्रेनिंग सत्रादरम्यानही दिसला होता. त्यादरम्यान बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तो भारतीय खेळाडूंशी बोलताना दिसत होता. आता तोही सामना पाहण्यासाठी पोहोचला आहे. पतीला चिअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये पोहोचणारी साक्षी बऱ्याच दिवसांनी स्टेडियममध्ये दिसली. दुसरीकडे, धोनी सध्या याच स्टेडियममध्ये आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णयही योग्य ठरला न्यूझीलंडने भारतासमोर १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे. २० षटकांत किवी संघाने ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. या सामन्यात अर्शदीप सिंगने खराब गोलंदाजी केली. त्याने चार षटकात ५१ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. अर्शदीप २०व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि त्याने २७ धावा दिल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने ३० चेंडूत नाबाद ५९ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याचे हे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक होते. त्याचवेळी डेव्हॉन कॉनवेने ३६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे नववे अर्धशतक होते. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी अर्शदीप, कुलदीप आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni ind vs nz dhoni arrived to watch the india vs new zealand t20 match with his wife watch video avw
First published on: 27-01-2023 at 21:09 IST